पुणे| रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा फुले महाविद्यालयाच्या मास कम्युनिकेशन विभागात दोन दिवसीय समभाव चित्रपट महोत्सव उत्साहात पार पडला. या आंतरराष्ट्रीय सिने महोत्सवाचे आयोजन (मावा) व मास कम्युनिकेशन विभाग महात्मा फुले महाविद्यालय पिंपरी यांच्या वतीने करण्यात आलं होतं.
आपला हा लढा सद्या स्त्री अत्याचारा पुरता मर्यादित नसून तो पितृसत्ताक समाजापर्यंत विस्तारला आहे. येणाऱ्या नव पिढीने समाजाला या पारंपरिक चौकटीतून बाहेर खेचून, एक नवे विचारवळण देण्याची गरज आहे, अशसंशब्दांत मावाचे सहाय्यक प्रवीण थोटे यांनी म्हटलं आहे.
देश विदेशातील निरनिराळे 14 चित्रपटांचा प्रेक्षकांना आस्वाद घेता आला. त्यात तुरुप, पहचान, वेव्ह, उषाचा या चित्रपटांबरोबरच राष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रपट खरवस आणि सन राईज यांचा देखील समावेश होता.
महोत्सवात सुमारे 200 लोकं सहभागी झाले होते. यात विद्यार्थी, प्राध्यापक, चित्रपटप्रेमी व सामान्य नागरीक देखील होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शरद बोदगे यांनी केले. विभाग प्रमुख तुषार डुकरे यांनी आभार प्रदर्शन केले. यावेळी मंचावर प्राचार्य डाॅ. पांडुरंग गायकवाड, हरीष सदानी, कॉर्डिनेटर डाॅ. माधव सरोदे , प्रा. ऋषिकेश खांबायत उपस्थित होते.
ट्रेंडिंग बातम्या-
भाजपसोबत पुन्हा युती करणार का?; उद्धव ठाकरे म्हणाले…
मराठा आरक्षण प्रकरणी महाराष्ट्र सरकारला सुप्रीम कोर्टाचा दिलासा!
महत्वाच्या बातम्या-
…म्हणून संपूर्ण मंत्रिमंडळाचे मनापासून अभिनंदन- राज ठाकरे
आंदोलनात लहान मुलांच्या सहभागावर बंदी घाला- झेन सदावर्ते
डॅडींना पुन्हा सुट्टीवर जायचंय; जाणून घ्या कारण…
Comments are closed.