बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आषाढीला परवानगी द्या, वारी होत नसल्यामुळेच कोरोना वाढतोय- संभाजी भिडे

सांगली | कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातलं होतं मात्र गेल्या काही दिवसांपासून आकडेवारीमध्ये लक्षणीय घट होताना दिसत आहे. परंतू  यंदाही कोरोना व्हायरसच्या संसर्गामुळे आषाढी वारीवर राज्य सरकारने निर्बंध लावले आहेत. दुसरीकडे आषाढी एकादशीला पायी वारीला परवानगी देण्यात यावी अशी मागणी वारकऱ्यांकडून केली जात आहे. अशातच शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनीही याबाबत अजब वक्तव्य केलं आहे.

आषाढी वारीला परवानगी द्या, वारी होत नसल्यामुळे कोरोना वाढत आहे. त्यामुळे वारीला परवानगी द्या, म्हणजे कोरोना जाईल, अशी मागणी संभाजी भिडे यांनी केली आहे. वारीला परवानगी देण्याबाबत शिवप्रतिष्ठानचे कार्यकर्ते आणि वारकरी संप्रदायाचे प्रमुख यांनी सांगलीचे जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांना निवेदन दिलं आहे.

मानाच्या पालख्यांचे वाहनातून प्रस्थान न करता मर्यादित वारकऱ्यांच्या उपस्थितीत पायी वारी झाली पाहिजे, असं संभाजी भिडे यांनी म्हटलं आहे. त्यासोबतच दारुच्या दुकानात जाणाऱ्या तरुणांना पोलीस अडवत नाहीत. पण विना मास्क फिरणाऱ्यांना 500 रुपये दंड केला जात असल्याचं भिडे म्हणाले. याआधी भाजपप्रणित अध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुषार भोसले यांनी वारीवर घातलेल्या निर्बंधावरून टीका केली आहे.

दरम्यान, मायबाप वारकऱ्यांनी शेवटपर्यंत राज्य सरकारच्या निर्णयाची वाट पाहिली. मात्र सत्तेच्या नशेत गुंग झालेल्या सरकारने वारकऱ्यांच्या परंपरेला आणि भावनेला साफ धुडकावलं. त्यामुळे आता उद्धव ठाकरे आणि अजित पवारांना पुढील परिणामांना सामोर जाण्याची तयारी ठेवावी, असं तुषार भोसले म्हणाले.

थोडक्यात बातम्या- 

‘…पण तुम्ही त्या अगोदरच जेलमध्ये असाल’; निलेश राणेंचं अजित पवारांवर टीकास्त्र

“…तर किसान सभा राज्य सरकारचा कठोर प्रतिकार करेल”

लसीच्या अपुऱ्या साठ्यामुळे उद्या लसीकरण मोहिमेला पुन्हा लागणार ब्रेक!

मोठी बातमी! सोलापुरमध्ये भाजप आमदार गोपीचंद पडळकरांच्या गाडीवर दगडफेक

लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांना विशेष सवलत द्या; ‘या’ भाजप खासदाराचं केंद्रीय अर्थमंत्र्यांना पत्र

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More