महिला सशक्तीकरणावर बोलत होते संबित पात्रा; एम. जे. अकबरांचा विषय निघताच काढला पळ!

फरिदाबाद | महिला सशक्तीकरणावर बोलणारे भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांची चांगलीच अडचण झाली. एम. जे. अकबर यांच्याविषयी प्रश्न विचारताच त्यांनी चक्क पळ काढला. 

हरियाणाच्या फरिदाबादमध्ये भाजपच्या महिला मोर्चातर्फे एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी संबित पात्रा यांनी महिलांना मार्गदर्शन केलं. 

कार्यक्रम संपताच पत्रकारांनी संबित पात्रांना गाठले. महिला सशक्तीकरणाच्या मुद्द्यावरुन त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांचं कौतुक केलं.

दरम्यान, पत्रकारांनी एम. जे. अकबर यांच्यावरील लैंगिक गैरवर्तनाच्या आरोपांचा प्रश्न उपस्थित करताच संबित पात्रा यांनी चक्क काहीही न बोलता त्या ठिकाणावरुन अक्षरशः पळ काढला.  

महत्त्वाच्या बातम्या-

-कर्जाच्या बदल्यात शरीरसुखाची मागणी करणाऱ्या बँक अधिकाऱ्याला महिलेनं चोपलं

-लातूरमधील 19 वर्षीय तरूणीच्या हत्या प्रकरणाला आता नवं वळण

-…म्हणून दान करण्यासाठी काढलेले 500 रुपये राहुल गांधींनी पुन्हा खिशात टाकले!

-मित्रांच्या आरोपांमुळे तरुण व्यथित; व्हॉट्सअॅपवर 10 स्टोरीज टाकून आत्महत्या

-क्रिकेटपटू मोहम्मद शमीची पत्नी हसीन जहांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या