नवी दिल्ली | काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी भाजपवर सातत्याने टीका करत आहे. यालाच प्रत्युत्तर देत भाजपने राहुल गांधींवर जोरदार निशाणा साधला आहे. भाजपने राहुल यांचा उल्लेख लाहोरी असा केला आहे.
इंडियन नॅशनल काँग्रेसही लवकरच पाकिस्तान नॅशनल काँग्रेस होईल, अशी टीका भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनी केली आहे.
भारत कोट्यवधी लोकांचा देश आहे, जिथे सर्व आनंदानं जगत आहेत. धर्माच्या कोणत्याही सीमा नाहीत. भारत एक लोकशाही देश आहे. तुम्ही पाकिस्तानशी तुलना करता. भारताविषयी तक्रारी करता. भारत भीक मागणाऱ्यांचा देश आहे असं म्हणता. याच वेगाने काम सुरू राहिलं, तर इंडियन नॅशनल काँग्रेसही लवकरच पाकिस्तान नॅशनल काँग्रेस होईल, असं संबित पात्रा यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
“दानवे म्हणाले ते त्रिवार सत्य, सरकार चालवणं हे येड्यागबाळ्यांचे काम नव्हे”
…म्हणूनच शरद पवारांना या वयात बांधावर जावं लागतंय- गोपीचंद पडळकर
कमलनाथांची जीभ घसरली; भाजपच्या महिला नेत्याचा आयटम म्हणून केला उल्लेख
3 धावांचं आव्हान! सुपर ओव्हरमध्ये कोलकात्याची हैद्राबादवर मात