‘आज तुझा मर्डर फिक्स’; सुहास कांदेंची समीर भुजबळांना धमकी

Maharashtra

Maharashtra l आज राज्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचा दिवस आहे. कारण आज महाराष्ट्र 288 जागांसाठी मतदान होत आहे. मात्र अशातच विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यापासूनच नांदगाव विधानसभा मतदारसंघाची राज्यभरात तुफान चर्चा आहे. परंतु आता विधानसभा निवडणुकीच्या दिवशी देखील नांदगाव विधानसभा मतदारसंघ चर्चेत आला आहे.

या मतदारसंघात तिहेरी लढत :

नांदगाव विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ यांनी या मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर शिवसेना शिंदे गटाचे सुहास कांदे, ठाकरे गटाचे गणेश धात्रक आणि अपक्ष डॉ. रोहन बोरसे यांच्यात विधानसभेचा सामना होणार आहे.

मात्र यंदाच्या वर्षी सुहास कांदे, गणेश धात्रक आणि समीर भुजबळ हे तीनही उमेदवार विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी मैदानात उतरल्याने या मतदारसंघात तिहेरी लढत होत आहे. मात्र आज सकाळी 7 वाजता मतदानाला सुरुवात झाली आहे. अशातच नाशिक जिल्ह्यातील नांदगाव विधानसभा मतदारसंघात मोठा राडा झाल्याची माहिती मिळत आहे.

नांदगाव-मनमाड रस्त्यावर घडला प्रकार :

यावेळी अपक्ष उमेदवार समीर भुजबळ आणि शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार सुहास कांदे यांच्या गटात तुफान राडा झाला आहे. मात्र आज मतदानाच्या दिवशी सुहास कांदे यांनी बोलावलेल्या मतदारांना समीर भुजबळ यांनी आडवल्याचे माहिती मिळाली आहे. त्यामुळे नांदगाव-मनमाड रस्त्यावर हा धक्कादायक प्रकार घडला असून दोन्ही गटात मोठा राडा झाल्याचे पाहायला मिळाले आहे.

News Title : Sameer Bhujbal was Stopped by voters of Suhas Kande in Nandgaon 

महत्वाच्या बातम्या –

भाजप अन् काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा; कुठं घडली घटना

मतदानाच्या दिवशी जरांगे पाटलांचं मराठा बांधवांना मोठं आवाहन; म्हणाले..

‘विनोद तावडे निर्दोष, त्यांच्याकडे कोणताही पैसा सापडला नाही..’; फडणवीस स्पष्टच बोलले

विनोद तावडेंच्या डायरी संबंधित नव्या दाव्यानं राजकारणात पुन्हा खळबळ!

शिंदे गटाच्या नेत्याच्या संबंधित गाडीत सापडले कोट्यवधी रुपये!

 

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .