बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘तुम्ही माझ्या पाया नका पडू, मीच तुमच्या पडतो’; ‘या’ मराठमोळ्या कलाकारासमोर झुकले महानायक!

मुंबई | अनेकांचं करोडपती होण्याचं स्वप्न पुर्ण करणारा छोट्या पडद्यावरील ‘कौन बनेगा करोडपती’ शो दिवसेंदिवस लोकप्रिय होत चालला आहे. देशातील सामान्य ते अतिसामान्य व्यक्ती बॉलिवुड अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या शोमध्ये सहभागी होत असतात. अशातच महाराष्ट्राला खळखळून हसवणारा ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कॉमेडी शोमधील कलाकारांनी अलिकडेच शोमध्ये हजेरी लावली. त्यावेळी चक्क अमिताभ बच्चन यांनी विनोदाचा बादशाह समीर चौगुलेंना आदराने खाली वाकून नमस्कार केला. त्यानंतर यांच्या भेटीचा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला.

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातील सगळ्या कलाकरांनी ‘कौन बनेगा करोडपती’ या शोमध्ये हजेरी लावली. ही कलाकार मंडळी ‘कौन बनेगा करोडपती’च्या  सेटवर गेल्यावर समीर चौगुले अमिताभ बच्चन यांच्याशी बोलायला गेले. तेव्हा समीर चौगुले अमिताभ बच्चन यांना म्हणाले की मला तुमच्या पाया पडायचे आहे. तेव्हा, तुम्ही नका माझ्या पाया पडू, मी तुमच्या पडतो, असं सांगून अमिताभ बच्चन समीर चौगुलेंच्या समोर झुकले. यानंतर हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला.

अमिताभ बच्चन आणि समीर चौगुले यांच्या भेटीचा फोटो पाहून अनेक जण आश्चर्यचकित झाले आहेत. या फोटोवर अनेक नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत. त्यामुळे त्यांचा हा फोटो सोशल मीडियावर सध्या प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे.

दरम्यान, कोट्यावधी रूपये कमवण्याचं स्वप्न पाहणाऱ्या अनेक जणांना या शोने करोडपती बनवलं आहे. त्यामुळे अनेक लोकांचं नशीब देखील या शोमुळे पालटलं आहे.

थोडक्यात बातम्या-

“राज्यात इतक्या घटना घडतात तरीही सरकार षंढासारखं बसलंय”

‘हे’ लक्षण आढळलं की कोरोना चाचणी पॉझिटिव्ह येते- उदयनराजे भोसले

दीपक हुड्डाला मोठा धक्का; बीसीसीआय करणार हुड्डाची चौकशी!

“ही तर राज्य सरकारची अपरिपक्वता, राज्यपालांना पत्र पाठवताना खातरजमा केली पाहिजे होती”

“Amazon ने केंद्र सरकारला 8,546 कोटींची लाच दिली”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More