समीर दुधगावकर यांचा भाजप प्रवेश निश्चित

परभणी | राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्यातील मोठे नेते अ‌ॅड. गणेशराव दुधगावकर यांचे चिरंजीव समीर दुधगावकर यांचा भाजप प्रवेश निश्चित झाला आहे. मुंबईत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.

25 किंवा 26 मार्चला त्यांचा पक्ष प्रवेश सोहळा मुंबईत होईल असं समीर दुधगावकर यांनी सांगितलं. परभणीचे माजी खासदार आणि राष्ट्रवादीचे मोठे नेते अ‌ॅड. गणेश दुधगावकर यांचे समीर दुधगावकर चिरंजीव आहेत.

समीर दुधगावकर 2-3 वर्षापासून हे सामाजिक कार्यात सक्रिय झाले होते. त्या आधी ते अमेरिकेत वास्तव्यास होते. तेथे शिक्षण पूर्ण करुन ते भारतात आले.

दरम्यान, माझी राजकीय सुरुवात चांगल्या विचाराच्या पक्षातून व्हावी अशी माझी इच्छा होती. त्यामुळे आपण भाजपमध्ये अधिकृतरित्या प्रवेश करत आहोत, असं समीर दुधगावकर यांनी यावेळी सांगितलं. 

महत्वाच्या बातम्या-

-लोकांना मूर्ख समजणे मोदींनी आता सोडावे- प्रियांका गांधी

-सुजय विखेंविरूद्ध राष्ट्रवादीचे संग्राम जगताप लोकसभेच्या रिंगणात

“माझी पत्नी आणि मुलं कधीच लोकसभा, विधानसभा लढणार नाहीत”

रोहित पवार म्हणतात चालू परिस्थिती म्हणजे, ‘मुख्यमंत्री आयात उमेदवार पवित्र करणे योजना’

पार्थ पवार म्हणतात, माझा पॅटर्न वेगळा… मी बोलतो कमी आणि काम जास्त करतो!