Top News पुणे महाराष्ट्र

समीर गायकवाडचा अखेरचा ‘तो’ व्हिडीओ होतोय व्हायरल; चाहत्यांना म्हणाला….

Photo Credit- Instagram/ Sameer Gaikwad

पुणे |  टिक टॉक स्टार समीर गायकवाडने केलेल्या आत्महत्येमुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. पुण्यातील राहत्या घरी समीरने साडीच्या साहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली होती. समीरने इतका टोकाचा निर्णय का घेतला याचं कारण अद्यापही समोर आलं नाही. टिक टॉक बंद झाल्यावर समीर इंस्टाग्रामरवर आपल्या रील्सने प्रसिद्ध झाला होता. समीरचा शेवटचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

समीर इंस्टाग्रामरवर ज्या रील्स करत होता त्या व्हिडीओंमध्ये तो जे डायलॉग होते ते प्रत्येकाच्या जीवनाशी निगडीत होते. त्यामुळे समीरचे रील्स मोठ्या प्रमाणात व्हायरल व्हायचे आणि त्याच्या चाहत्यांनाही आवडायचे. समीरने आत्महत्या करण्याच्याआधी एक व्हिडीओ पोस्ट केला होता. त्याचा हा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

समीर जे व्हिडीओ बनवायचा त्यामधून तो काही सल्ले, प्रेरण देत होता. यामध्ये त्याची अभिनयाची शैली तरूणाईच्या पसंतीस उतरत होती. अशाच प्रकारे त्याचा अखेरचा व्हिडीओ आहे. त्यामध्ये समोरच्याने चहाचं दुकान टाकलं तर आपण देखील चहाचं दुकान टाकाचं नसतं. तू दुधाच टाक म्हणजे दोघ मिळून पुढे जा, पण नाही आपल्याला तेच टाकायचं असतं म्हणजे तो भिकारी आणि आपण कर्जबाजारी, अरे सुधरा खेकड्यांनो, असे डायलॉग त्याच्या शेवटच्या व्हिडीओमध्ये आहेत.

दरम्यान, समीरच्या प्रत्येक व्हिडीओमधून काहीना काही सल्ला आमि प्रेरणा असायची. त्यामुळे तरूण-तरूणींच्या व्हाट्सअॅप स्टेटसला समारचे व्हिडीओ असायचे. मात्र त्याच्या अशा आकस्मात जाण्याने त्याचे घरच्यांना आणि चाहत्यांना फार मोठा धक्का बसला आहे. समीरने पुण्यात संध्याकाळी साडे पाच वाजण्याच्या सुमारास केसनंद रस्त्यावरील मिकासा इमारतीत आत्महत्या केली. समीर पुण्यातील वाडिया महाविद्यालयात शिकत होता.

 

थोडक्यात बातम्या-

जोपर्यंत उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहेत तोपर्यंत महाराष्ट्रातून कोरोना जाणार नाही – निलेश राणे

‘आमच्या जिल्हयात सामना येतचं नाही’; पडळकरांचा शिवसेनेवर हल्लाबोल

बॅंकेत कर्मचारी सांगून केलं लग्न पण डोळ्याअंधारी करायचा ‘हे’ उद्योग

‘कृष्णकुंजवर न्याय मिळतो’; मावळवासियांकडून राज ठाकरेंचे आभार

पेट्रोल-डिझेल दर वाढीबाबत पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केला मोठा खुलासा!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या