बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

वानखेडे कुटुंबीय राज्यपालांच्या भेटीला; 2 गुन्हे दाखल झाल्याने नवाब मलिकांच्या अडचणी वाढल्या

मुंबई | अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक विरूद्ध एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यातील वाद शिगेला पोहोचला आहे. मलिक विरूद्ध वानखेडे वाद चालू असताना आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस देखील नवाब मलिकांच्या विरोधात मैदानात उतरले आहे. महाराष्ट्रात राजकीय युद्ध रंगत असताना, मलिकांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

नवाब मलिक कधी पत्रकार परिषदा घेत तर कधी ट्विट करत समीर वानखेडे आणि त्यांच्या कुटुंबीयांवर आरोपांच्या फैरी झाडत आहेत. नवाब मलिकांच्या या आरोप सत्राविरोधात वानखेडे कुटुंबीय आक्रमक झाले आहेत. समीर वानखेडेंच्या कुटुंबीयांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेत त्यांना या घडामोडी सांगितल्या आहेत.

समीर वानखेडे यांची पत्नी क्रांती रेडकर, वडील ज्ञानदेव वानखेडे आणि वानखेडेंची बहिण यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. आम्ही आमचं म्हणणं राज्यपालांकडे मांडलं असून आम्ही खऱ्याची लढाई लढत आहोत. आम्हाला राज्यपालांचा पाठिंबा हवा आहे आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं असल्याचं क्रांती रेडकर यांनी माध्यमांना सांगितलं आहे.

वानखेडे कुटुंबाकडून नवाब मलिकांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. तर क्रांती रेडकरच्या बहिणीनेही गोरेगाव पोलिस स्थानकात जाऊन नवाब मलिकांच्या विरोधात लेखी तक्रार दाखल केली आहे. नवाब मलिकांविरोधात आधीच 2 तक्रार दाखल झाल्या आहेत त्यात वानखेडे कुटुंबीयांनी राज्यपालांची भेट घेतल्याने मलिकांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

थोडक्यात बातम्या-

ट्विटरवर जगातील दुसरे सर्वात प्रभावशाली व्यक्ती ठरले पंतप्रधान नरेंद्र मोदी!

न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यासाठी भारतीय संघ जाहीर; टी 20 संघाच्या कर्णधारपदाची धुरा ‘या’ खेळाडूकडे

आधी लस घ्या मगच पेट्रोल, गॅस आणि रेशन मिळवा; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

‘अनिल देशमुखांचा बळी दिला जातोय’; प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य

“नारायण राणेंसारख्या गद्दाराची डाळ शिजू देणार नाही”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More