बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“जातीचा बोगस दाखला दाखवून समीर वानखेडेंनी नोकरी मिळवली”

मुंबई | बॉलिवूड अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान याला ड्रग्ज प्रकरणी एनसीबीकडून अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी राज्यात वादंग सुरू आहे. ड्रग्ज प्रकरणात पंच असलेल्या प्रभाकर साईलने केलेल्या खुलाशामुळे समीर वानखेडे यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आले आहे. त्यातच आता राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

जातीचा बोगस दाखला दाखवून समीर वानखेडे यांनी आयआरएसची नोकरी मिळवली, असा धक्कादायक आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. खोटा दाखला काढून समीर वानखेडे यांनी एका मागासवर्गीय व्यक्तीची संधी हिरावली आहे. याअगोदरच मंत्री नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर अनेक आरोप देखील केले आहेत. त्यातच आता समीर वानखेडे यांच्या नोकरीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

समीर वानखेडे यांच्या जन्माचा दाखला मी प्रसिद्ध केला आहे. दाऊद वानखेडे यांनी धर्मांतर केल्यावर हा जन्मदाखला काढण्यात आला आहे. त्यावर खाडाखोड करण्यात आली आहे इथूनच त्यांची बोगसगिरी सुरू झाली आहे, असा धक्कादायक आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. हळूहळू ही सगळी बोगसगिरी मी बाहेर काढेन, असा इशारा नवाब मलिक यांनी यावेळी समीर वानखेडे यांना दिला आहे.

दरम्यान, समीर वानखेडे मुस्लीम आहेत. नोकरीसाठी त्यांनी बोगस दाखला काढून ही नोकरी मिळवली आहे, असा दावा नवाब मलिक यांनी केला आहे. यावर माझ्याशी संबंधित खोटी कागदपत्रे व्हायरल केली जात असून या प्रकरणाला मी कायदेशीर आव्हान देणार आहे, असं प्रत्युत्तर समीर वानखेडे यांनी दिलं आहे.

थोडक्यात बातम्या-

ड्रग्स प्रकरणावर राज्यपाल कोश्यारीचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

फाडफाड इंग्रजी शिकायचीय?, मग Google करेल तुमची मदत!

‘माझे वडील हिंदू तर आई मुस्लीम, पण मी…’; मलिकांच्या आरोपावर वानखेडेंचं प्रत्युत्तर

पेट्रोल आणि बिअरची तुलना केल्याने शत्रुघ्न सिन्हा ट्रोल! नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली

सुपरस्टार रजनीकांत दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित; वाचा चित्रपट पुरस्कार विजेत्यांची यादी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More