बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“प्रकरण माझ्या वरिष्ठांकडे आहे, माझ्यावर कारवाई केली जाऊ नये”

मुंबई | समीर वानखेडे हे नाव गेल्या अनेक दिवसांपासून चांगलंच चर्चेत असल्याचं पाहायला मिळत आहे. तसेच यामध्ये प्रसिद्ध सिनेअभिनेता शाहरूख खान याचा मुलगा अडकल्याने ती एक हायप्रोफाईल केस बनली आहे.

समीर वानखेडे यांच्यावर नवाब मलिक आणि एकंदर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून मोठ्या प्रमाणात टीकेची तोफ डागण्यात येत आहे. तसेच मोठ्या प्रमाणात गंभीर आरोप देखील केले जात आहेत. त्यामुळे आता या प्रकरणात अनेक खुलासे होत असताना समीर वानखेडे यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत होती. यावरून आता समीर वानखेडे यांनी थेट मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांना पत्र लिहिलं आहे.

“खोट्या आणि चुकीच्या पद्धतीने बनावट प्रकरणात मला अडकवून धमकी देण्यात आली”, असं त्यांनी आपल्या पत्रात नमूद केलं आहे. त्यामुळे संभाव्य कारवाईपासून संरक्षण मिळावं म्हणून त्यांनी हे पत्र पाठवले आहे. तसेच या प्रकरणात कारवाई होणार नाही, अशी हमी द्यावी असेही त्यांनी म्हटले आहे.

आर्यन खान प्रकरणात आता नवनवीन गोष्टी समोर येत असताना काल संजय राऊत यांनी एक व्हिडिओ पोस्ट केला होता. त्यानुसार आता या प्रकरणात राजकीय हस्तक्षेप मोठ्या प्रमाणात होत असल्याचं दिसून येतंय. तसेच हे संपूर्ण प्रकरण माझ्या वरिष्ठांकडे आहे, माझ्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई करू नये, असं देखील त्यांनी पत्रात म्हटलं आहे. यावर आता पुढे नेमकं काय होणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या –

दिवसभर फ्रेश राहण्यासाठी आहारात करा ‘या’ गोष्टींचा समावेश

“एखाद्या खासदाराला आपला उमेदवारी अर्जही भरता येऊ नये याला काय म्हणावं?”

पाकिस्तानने सामना जिंकल्यानंतर अशी होती पंतप्रधान इम्रान खान यांची प्रतिक्रीया

सोनं खरेदी करणाऱ्यांना दिलासा; दिवाळीत सोनं मिळणार स्वस्तात!

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सणासुदी आधीच केंद्राकडून अलर्ट जारी

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More