बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“…तोपर्यंत ड्रग्स प्रकरणाची चौकशी समीर वानखेडेचं करतील”

मुंबई | आर्यन खान ड्रग्ज प्रकरणानंतर राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक विरूद्ध एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यात वाद सुरू आहे. नवाब मलिक हे समीर वानखेडे यांच्यावर सातत्याने आरोप करत आहेत. त्यातच आता कॅडेलिया क्रुझ रेव्ह पार्टी प्रकरणाची चौकशी समीर वानखेडेच करतील, असं  एनसीबीचे उपमहासंचालक ज्ञानेश्वर सिंह यांनी सांगितलं आहे.

समीर वानखेडे यांच्याविरोधात जोपर्यंत ठोस पुुरावे मिळत नाहीत तोपर्यंत त्यांच्याकडील तपास  हटवण्यात येणार नाही, असंही ज्ञानेश्वर सिंह यांनी म्हटलं आहे. यावेळी ज्ञानेश्वर सिंह म्हणाले की, एनसीबीचा पंच प्रभाकर साईल याने प्रतिज्ञापत्राच्या स्वरूपातील एक कागद सोशल मीडियात व्हायरल केला होता. या व्हायरल कागदाच्या चौकशीसाठी एनसीबीने विशेष पथकाची नियुक्ती केली होती, असं ज्ञानेश्वर सिंह यांनी सांगितलं.

बुधवारी समीर वानखेडे यांची चौकशी करण्याकरिता पाच सदस्यीय टीम मुंबईत दाखल झाली आहे. चार तासांच्या चौकशीनंतर समीर वानखेडे यांचा जबाब नोंदवण्यात आला आहे. त्यांनी चौकशी पथकापुढे अनेक तथ्य मांडले. गरज पडल्यास त्यांच्याकडून आणखी कागदपत्र आणि पुरावे मागवण्यात येतील. जो पर्यंंत त्यांच्याविरोधात ठोस पुरावे सापडत नाहीत तोपर्यंत तेच क्रुझवरील केसचा तपास करतील. मुंबई पोलीस जबाबदार पोलीस आहेत. त्यांच्याबद्दल मी काही बोलणार नाही,असं ज्ञानेश्वर सिंह यांनी म्हटलं आहे.

दरम्यान,  या प्रकरणाची आम्ही निष्पक्ष चौकशी करणार आहोत. प्रमुख पंचाना चौकशीसाठी नोटीस पाठवण्यात आली असून त्यांना चौकशीसाठी हजर राहावं लागणार आहे.परंतु त्यांचा संपर्क होत नाही, असं ज्ञानेश्वर सिंह म्हणाले आहेत. तसेच याप्रकरणासंबंधात अनेक कागदपत्र आम्ही ताब्यात घेतली आहेत, असं ज्ञानेश्वर सिंह यांनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या- 

ऐन दिवाळीत महागाईचा भडका! सिलेंडरच्या किंमती वाढण्याची शक्यता

रडण्यानेही वजन कमी होतंय, कसं ते वाचा सविस्तर

राज्याच्या कोरोना आकडेवारीत चढ-उतार, वाचा आजची ताजी आकडेवारी

पुणे कोरोनामुक्तीच्या वाटेवर, वाचा आजची ताजी आकडेवारी

मुंबईच्या कोरोना आकडेवारीत कमी अधिक प्रमाणात वाढ, जाणून घ्या आजची आकडेवारी

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More