बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

एनसीबी अधिकाऱ्याच्या ‘त्या’ लेटर बाॅम्बवर समीर वानखेडेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

नवी दिल्ली | आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात आता हळूहळू एनसीबी अधिकारी समीर वानखेडेच अडकत चालल्याचं दिसत आहे. त्यांच्यावर आरोपांची मालिका सुरुच आहे. राष्ट्रवादी नेते आणि प्रवक्ते नवाब मलिक यांनी तर त्यांच्यावर आरोपांचं सत्रच लावलं आहे. नुकतच नवाब मलिकांनी वानखेडेंवर लेटर बाॅम्ब टाकत मोठा गौप्टस्फोट केला आहे.

नवाब मलिकांनी दोन ट्विट करत सगळीकडे खळबळच माजवली. अज्ञात एनसीबी अधिकाऱ्यानं दिलेलं पत्र शेअर करत नवाबांनी समीर वानखेडेंवर हल्लाबोल चढवला आहे. त्यांनी केलेल्या या गंभीर आरोपांवर आता समीर वानखेडेंनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

नवाब मलिकांच्या आरोपांवर समीर वानखेडे यांनी म्हटलं की, नवाब मलिक त्यांना जे वाटतं ते करतात. त्यांना मिळालेलं पत्र खोटं आणि हास्यास्पद आहे. याशिवाय त्यांनी शेअर केलेल्या पत्रातील मजकूरही खोटा आहे. हे पत्र सगळं बनावट आहे.

दरम्यान, नवाब मलिक यांनी शेअर केलेल्या पत्रातून अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. याशिवाय हे पत्र त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनाही दिलं आहे. यामध्ये 26 प्रकरणांचा खुलासा झाला आहे.

थोडक्यात बातम्या – 

पेट्रोल महागलं म्हणून ‘या’ पठ्ठ्यानं चक्क खरेदी केला घोडा

मराठी सिनेमाचा सोनेरी काळ पाहिलेल्या ‘किबे लक्ष्मी थिएटर’चा पडदा कायमचा बंद होणार?

गावावरुन आलं, बुधवार पेठेत गेलं अन् भलतंच घडलं…

मराठी सिनेसृष्टीतील अजरामर अभिनेता लक्ष्याचा आज जन्मदिवस, पाहा त्याचे आठवणीतील फोटोज्

‘एनसीबीच्या अज्ञात अधिकाऱ्याकडून पत्र’, नवाब मलिकांच्या ट्विटनं पुन्हा खळबळ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More