बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोठी बातमी! एनसीबी अधिकारी समीर वानखेडेंच्या अडचणी वाढल्या

मुंबई | समीर वानखेडे यांच्या अडचणी कमी होण्याऐवजी वाढतानाच दिसत आहेत. आता त्यांच्या कास्ट सर्टिफिकेट वरून वानखेडे पुन्हा एकदा अडचणीत येणार आहेत. नवाब मलिक यांनी लावलेल्या आरोपानंप समीर वानखेडे यांच्या जातीवरून अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. त्यानंतर आता मुंबई विभागातील कास्ट सर्टिफिकेट स्क्रुटनी कमिटी समीर वानखेडेंच्या कास्ट सर्टिफिकेटची पडताळणी करणार आहे.

या प्रकरणाच्या तपासासाठी मुंबई पोलिस एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. दोन लोकांनी यासंदर्भात तक्रार आली होती. त्यानंतर स्क्रुटनी कमिटीने या कास्ट सर्टिफिकेटची पडताळणी करण्याचा निर्णय घेतला आहे. स्वाभिमानी रिपब्लिक पक्षाचे मनोज संसारे आणि भीम आर्मचे अशोक कांबळे या दोघांच्या तक्रारीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. 30 नोव्हेंबरला या प्रकरणावर सुनावणी होणार आहे.

त्यामुळे आता समीर वानखेडे यांना लवकरच कास्ट सर्टिफिकेट स्क्रुटनीसमोर हजर रहावं लागणार आहे. त्यानंतर कमिटी सर्व कागदपत्रांची खात्री करून घेण्याची प्रक्रिया सुरु होणार आहे. तक्रारदारांनी कमिटीकडे समीर वानखेडेंचा निकाहनामा आणि जन्मदाखला सादर करून समीर वानखेडेंचं कास्ट सर्टिफिकेट खोटं असल्याचा दावा केला आहे.

तक्रारदारांनी तक्रार करताना म्हटलं आहे, समीर वानखेडे याचं कास्ट सर्टिफिकेट खोटं आहे. हे सर्टिफिकेट मिळवण्यासाठी मुळ तथ्यांमध्ये छेडछाड करण्यात आले आहेत. त्यामुळे त्यांना एस सी कॅटेगिरीमध्ये नोकरी मिळू शकेल, अशी तक्रार त्यांनी दाखल केली आहे. त्यामुळे आता लवकरच या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लागण्याची शक्यता आहे.

थोडक्यात बातम्या-

“तुम्ही या देशात आहात की परदेशात? तुमचा ठावठिकाणा आधी सांगा”

“मी प्रत्येक मुर्खाला पाठींबा द्यायला हवा का?”

“एसटी कर्मचाऱ्यांनी रक्त आटवणे म्हणजे भिंतीवर डोके फोडून घेण्यासारखे”

निवडणुकीच्या तोंडावर नाना पटोले फडणवीसांच्या भेटीला, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

“अनिल देशमुखांना बोगस केसमध्ये अडकवण्याचा राजकीय डाव आम्ही उलटवून लावू”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More