बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मलिकांच्या आरोपांवर समीर वानखेडेंचं प्रत्युत्तर, म्हणाले ‘माझ्या मूळ गावी जाऊन…’

मुंबई | आर्यन खान ड्रग्ज प्रकरण दिवसागणिक चिघळत चाललं आहे. याप्रकरणात रोज नवनवीन खुलासे होताना दिसत आहेत. अशातच आता याप्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावरही आरोप केले जात आहेत. नुकतंच राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते आणि प्रवक्ते नवाब मलिक यांनी वानखेडेंवर हल्लाबोल चढवत अनेक आरोप केले. आता या आरोपांवर समीर वानखेडेंनी प्रतिक्रिया दिली आहे.

नवाब मलिक यांनी समीर वानखेडेंचा जुना फोटो ट्विट करत पेहचान कौन? असा प्रश्न केला आहे. याशिवाय त्यांनी समीर दाऊद वानखेडे याने फर्जीवाडा करुन नोकरी कशी मिळवली आहे हे जातप्रमाणपत्र शेअर करत निशाणा साधला आहे. आता यावर वानखेडेंनी प्रतिक्रिया दिली आहे.

मलिकांच्या आरोपांवर उत्तर देत वानखेडेंनी म्हटलं की, सोशल मीडियावर व्हायरल होणारा जन्म दाखला खोटा असून या खोडसाळपणा विरोधात मी कोर्टात चॅलेंज करणार आहे. माझ्या मूळ गावी जाऊन माझा जन्म दाखला तपासा असंही वानखेडेंनी म्हणलं आहे.

दरम्यान, आता या आरोपांवर कायदेशीर उत्तर देणार असल्याचं समीर वानखेडे म्हणाले. त्यामुळे आता पुन्हा एकदा या मुद्द्यांवरुन राजकीय वातावरण तापलं आहे.

थो़डक्यात बातम्या – 

भारतीय संघाची चिंता वाढली! ‘हा’ प्रसिद्ध खेळाडू पोहोचला रूग्णालयात

एकीकडे पाकिस्तान मैदानावर इतिहास रचत होता, तर दुसरीकडे पाकिस्तानात 10 जणांचा मृत्यु झाला

‘ते’ ट्विट शेअर करत नवाब मलिकांचा समीर वानखेडेंवर घणाघात, म्हणाले…

महाराष्ट्राची धाकधूक वाढली, कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा राज्यात शिरकाव

थलायवा रजनीकांत यांनी सोशल मीडियाद्वारे केली ‘ही’ महत्त्वाची घोषणा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More