बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मुख्यमंत्र्यांविरोधात वादग्रस्त टीका केल्याप्रकरणी कारवाई झालेल्या तरूणाने वाझेंबाबत केला खळबळजनक दावा!

मुंबई | काही महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंविरोधात केलेल्या आक्षेपार्ह टीकेमुळे कारवाई झालेला समीत ठक्कर याने सध्या चर्चेत असलेल्या मनसुख हिरेन प्रकरणावर भाष्य करत एक खळबळजनक दावा केला आहे. सचिन वाझे यांच्यााबाबत समीतने मोठं वक्तव्य केलं आहे.

पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या सीडीआरवरून ते मनसुख हिरेन यांच्याबरोबरच महाराष्ट्रातील एका नेत्याच्या सातत्याने संपर्कात होते, असा दावा समीत ठक्करने केला आहे. त्याने या संदर्भात एक ट्विट केलं आहे.

सचिन वाझे आणि या नेत्यामध्ये टेलिग्रामवरून चॅटींगही झालं आहे. सध्यातरी मी तो नेता विद्यमान आमदार असल्याचं सांगू शकतो. कारण मला माझ्यावर आणखी गुन्हा नकोय. याबाबत एनआयए चौकशी करत आहे, त्यांना त्यांचं काम करू द्या, असं ट्विट समीत ठक्करने केलं आहे.

दरम्यान,तब्बल 13 तासांच्या चौकशीनंतर एपीआय सचिन वाझे यांना एनआयएने अटक केली आहे. वाझे यांनी अटकेपासून वाचण्यासाठी शुक्रवारीच जिल्हा सत्र न्यायालय ठाणे येथे अंतरीम जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. याप्रकरणी 19 मार्चला सुनावणी होणार होती. शनिवार सकाळी 11 वाजल्यापासून रात्री 11.30 वाजेपर्यंत वाझेंची चौकशी सुरू होती. मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात वाझे यांची भूमिका संशयास्पद असल्याने गेल्या काही दिवसांपासून ते एटीएस आणि एनआयएच्या रडारवर होते. वाझेंचा अंबानी यांच्या घरासमोर स्फोटकांची गाडी उभी करण्यात सहभाग घेतल्याचा आरोप करण्यात आलाय.

थोडक्यात बातम्या- 

13 तासांच्या झडतीनंतर सचिन वाझे यांना NIA ने ठोकल्या बेड्या

मला कडक लॉकडाऊन लावण्यास भाग पडू नका- उद्धव ठाकरे

धक्कादायक! राज्यात कोरोनाचा वाढता आलेख, जाणून घ्या आजची आकडेवारी

शेर की झलक सबसे अलग! युवी पाजी तुस्सी ग्रेट हो, 4 चेंडूत 4 सिक्सर, पाहा व्हिडीओ

“केवळ भाजप असा पक्ष आहे जो गरिबांच्या कल्याणासाठी कायम झटत असतो”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More