संमथाच्या साडीचं वजन आणि किंमत ऐकून डोळे पांढरे होतील!
नवी दिल्ली | साऊथ अभिनेत्री संमथा रुथ प्रभु (Samatha Ruth Prabhu) सध्या तिच्या शांकुतलम या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात ती शांकुतलेची भूमिका साकारताना दिसणार आहे. हा चित्रपट कालीदास याचं ‘अभिनाज्ञ शाकुंन्तलम’ या नाटकावर आधारित आहे. याच चित्रपटाविषयी एक थक्क करणारी गोष्ट समोर आली आहे.
चित्रपट थोडासा वेगळा असल्यानं त्यासाठी लागणाऱ्या कपड्यांची व्यवस्था करणं थोडसं अवघड जातं. संमथाला या चित्रपटासाठी एक साडी (saree) हवी होती. त्यासाडी साठी प्रचंड पैसे मोजावे लागले आहेत. संमथाने नेसलेल्या या साडीचं वजन 30 किलो इतकं असून त्याची किंमत 3 करोड आहे.
या चित्रपटासाठीचं बजेट 70 करोड आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक (Director) अर्वाडविनिंग गुणशेखर (Gunasekhar) यांनी केलं आहे. बजेटमधील 3 करोड इतका पैसा निव्वळ साडीसाठी खर्च झाल्यानं चर्चा होत आहे. हा चित्रपट 17 फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला असून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे.
हा चित्रपट 2022 ला प्रदर्शित होणार होता. चित्रपटाच्या 3D रुपांतरामुळं रिलीज डेट पुढं ढकलण्यात आली. दरम्यान, याशिवाय संमथा तिच्या अजून एका येणाऱ्या चित्रपटात पहायला मिळणार आहे. अभिनेता विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda) सोबतच्या ‘खुशी’ या रोमॅटिक ड्रामा चित्रपटात दिसणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
Comments are closed.