Top News

“राफेल करार हवाई दल बळकटीकरणासाठी की गाळात बुडालेल्या उद्योगपतीच्या बळकटीकरणासाठी?”

मुंबई | राफेल करार हवाई दल बळकट करण्यासाठी झाला की गाळात बुडालेल्या उद्योगपतीच्या बळकटीकरणासाठी? या प्रश्नाचं उत्तर नरेंद्र मोदींनी द्यावं, असं सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे. सामनामध्ये राफेल प्रकरणावर ‘काळे पान’ हा अग्रलेख प्रसिद्ध झाला आहे.

लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राफेलचं समर्थन केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी या प्रकरणातील ‘काळं पान’ समोर आल्यानं मोदींच्या भाषणावर बाकं वाजवून देशभक्तीचे नारे देणारांची तोंड बंद झाली, असा निशाणा ‘सामना’मधून भाजपवर साधण्यात आला आहे.

राफेल प्रकराणाबाबत ‘द हिंदू’ या वृत्तपत्रानं दिलेल्या बातमीमूळं राफेल प्रकरणातील नरेंद्र मोदींच्या ‘सहभागा’बाबतचा दस्ताऐवज बाहेर पडला, असं सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे.

दरम्यान, राफेल प्रकरणाबाबत ‘द हिंदू’ या वृत्तपत्रानं दिलेली बातमी खो़डसळ आणि अर्धवट असून यात संपूर्ण सत्य मांडलं नाही, असं भाजप नेते म्हणत आहेत. 

महत्वाच्या बातम्या-

उपमुख्यमंत्रीपदावर असताना माझ्याही गाडीला ट्रकनं धडक दिली होती- अजित पवार

पवारसाहेब तुम्ही बारामतीतून लढा, माढ्यात तुम्हाला पराभूत करु- चंद्रकांत पाटील

देवेंद्र फडणवीसांच्या भीतीने शरद पवारांची पुण्यातून माघार?

अर्णब गोस्वामींच्या विरोधात कोलकाता पोलिसांची तक्रार

-नितीन गडकरी होणार पंतप्रधान; ज्योतिष परिषदेत झाली भविष्यवाणी!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या