बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“4 गाढवं एकत्र चरत असली, तरी हुकूमशहाला भीती वाटते की…”

मुंबई | संसदेत असंसदीय शब्द बोलण्यावर मनाई करण्यात आली आहे. सुरुवातील असंसदीय (Unparliamentary) शब्दांचा वापर करण्यास निर्बंध येणार असल्याचं सांगितलं जायचं पण आता असे शब्द सभागृहाच्या कामकाजातून काढून टाकण्याचा निर्णय संसदेत घेण्यात आला. तसेच संसद भवन (Parliament of India) परीसरात निदर्शने, धरणे, उपोषण आणि आंदोलन करण्यास मनाई केल्याने आता सामनाच्या (Samna Editorial) अग्रलेखातून केंद्र सरकारला जाब विचारण्यात आला आहे.

हुकूमशहा हा डरपोक माणूस असतो. चार गाढवं एकत्र आली तरी त्यांना भिती वाटते. आपल्या विरुद्ध काहीतरी कटकारस्थान चालले आहे असे त्याला वाटते. आजचे चित्र यापेक्षा वेगळे दिसत नाही. असे आज सामनाच्या संपादकीय मधून छापून आले आहे. भारतीय संसदेने असंसदीय शब्दांची एक यादी तयार केली आहे. जयचंद, शकुनी, जुमलाजीवी, दलाल, सांड, भ्रष्ट, असत्य, अपमान, तानाशहा, विनाश पुरुष, काला बाजारी असे शब्द संसदेत बोलण्यावर बंदी घातली गेली आहे, असे देखील अग्रलेखात म्हटले आहे.

सत्ताधारी बाकांवरील सदस्य हे गेल्या काही वर्षांपासून शिस्तीचे अजीर्ण झाल्याप्रमाणे वागत आहेत. पण विरोधी बाकांवरील सदस्यांनीही या अमोघ शब्दशस्त्रांचा वापर करु नये यासाठी हा सगळा डाव केंद्रसरकारने रचला आहे. महाराष्ट्रात गद्दारीचा प्रयोग घडवून दिल्लीने लोकशाहीचा गळा घोटलाच आहे. या तानाशाहीवर संसदेत आवाड उठवताना आता सदस्यांनी काय व कसे मत व्यक्त करायचे?, असा प्रश्न शिवसेनेने केला आहे.

या नवीन असंसदिय शब्दकोशावरून देशात वादंग निर्माण झाले. काँग्रेस नेते राहुल गांधींनी (Rahul Gandhi) या कृतीला ‘नव्या भारताचा नवा शब्दकोश’ असे म्हंटले आहे तर तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओब्रायन (Derek O’brien) यांनी माझ्यावर कारवाई करा, मला निलंबित करा, मी हे शब्द वापरत राहीन. मी लोकशाहीसाठी लढणार आहे. असे म्हंटले आहे.

थोडक्यात बातम्या – 

“शरद पवार कधी घरात बसतात आणि मी पार्टी सोडून जातो”

अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे भाज्या महागल्या; दर आणखी वाढण्याची भीती

रानिल विक्रमसिंघे यांनी श्रीलंकेचे अंतरिम राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली!

मोठी बातमी! प्रसिद्ध अभिनेता दिग्दर्शकाचा राहत्या घरी आढळला मृतदेह

सुष्मिता डेट करत असलेल्या ललित मोदीची संपत्ती आली समोर; वाचून तुमचेही डोळे होतील पांढरे

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More