बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“सगळी सोंगं जमतील पण पैशाचं नाही, याचं भान अजितदादांनी ठेवलं, ते कौतुकास पात्र”

मुंबई | राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी महाविकास आघाडीचा दुसरा अर्थसंकल्प विधानसभेत सादर केला. या अर्थसंकल्पाचं तसेच अर्थसंकल्प मांडणाऱ्या अजित पवारांचं शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखातून तौंडभरून कौतुक केलं आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाआघाडी सरकारचा दुसरा अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी सोमवारी विधानसभेत सादर केला. सगळी सोंगे आणता येतात पण पैशाचं सोंग आणता येत नाही, याचं पुरेपूर भान ठेवत अर्थमंत्र्यांनी राज्यातील सर्व विभागांचा, विविध क्षेत्रांचा आणि घटकांचा साकल्याने विचार करून एक सर्वसमावेशक आणि समतोल म्हणावा असा अर्थसंकल्प सादर केला, असं शिवसेनेनं अर्थसंकल्पात म्हटलंय.

महाराष्ट्राला विकासाच्या वाटेवर पुढे नेणारा हा अर्थसंकल्प आहे. महाराष्ट्राचे हित जोपासणारा आणि सर्वांना समाधानी करणारा हा अर्थसंकल्प आहे, असंही सामानामध्ये म्हटलं आहे.

अर्थसंकल्पावर टीका करणे हे विरोधकांचे पारंपरिक काम आहे. त्यामुळे ते कितीही आगपाखड करत असले, तरी अर्थसंकल्पातील एकंदर तरतुदी पाहता राज्यातील महत्त्वाच्या घटकांना काही ना काही देण्याचाच प्रयत्न अर्थसंकल्पात जागोजागी दिसतो. जनतेच्या खिशातून नव्याने काही काढण्याचा कुठेही प्रयत्न दिसत नाही. या अर्थाने हा अर्थसंकल्प घेणारा नव्हे तर देणारा आहे, असं म्हणत अर्थसंकल्पावर टीका करणाऱ्यांना शिवसेनेनं अग्रलेखातून प्रत्युत्तर दिलं आहे.

थोडक्यात बातम्या-

“हे सरकार नसून दरोडेखोरांची टोळी आहे, यांच्यापासून देशाला वाचवावं लागेल”

मुलाच्या नाकातून येणारा वासावर सर्जरी केल्यानंतर डाॅक्टरांना देखील बसला धक्का!

तक्रार करण्यासाठी गेलेल्या महिलेसोबत पोलिसांनी केलं धक्कादायक कृत्य!

#Corona पुण्यात आजही कोरोना रुग्णांमध्ये मोठी वाढ; जाणून घ्या सविस्तर आकडेवारी

महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यातही अंश:त लाॅकडाऊन; जाणून घ्या!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More