आमदारांपाठोपाठ आता शिवसेनेचे अनेक खासदार (MP) देखील शिंदे गटाकडे वळत आहेत. त्यावर शिवसेना (Shivsena) संतापली असून तीव्र शब्दात शिंदे गटावर वार केले आहेत. महाराष्ट्राची सूत्रे आज दिल्लीच्या हातात आहेत. महाराष्ट्रावर सध्या सुलतानी संकट आहेच, पूर्वीचे सुलतान मंदिरे पाडत होते, आताचे सुलतान शिवसेना पाडत आहेत, असा घाणाघात शिवसेनेने केला. त्यांनी एकनाथ शिंदेंची तुलना सुलतानांशी केली आहे.
स्वत:ला शिवसेनेचा मुख्यमंत्री म्हणवून घेणारे एकनाथ शिंदे दिल्ली दरबारी का जातात? दिल्लीला मोदी – शहांच्या (Narendra Modi and Amit Shah) पायांवर त्यांनी शिवसेनेच्या खासदारांचा नजराणा पेश केला आहे. यापूर्वी शिवसेनेचे तीन मुख्यमंत्री झाले. पण ते कधीही मंत्रीमंडळाच्या चर्चेसाठी दिल्लीत गेले नाहीत. दिल्लीसमोर झुकल्याने आणि मोडून पडल्याने शिंदे यांना मुख्यमंत्रीपद मिळाले, हे आता उघड झाले आहे.
दिल्लीपुढे महाराष्ट्र कधी झुकला नाही, पण हा स्वाभिमान मंत्र यावेळी तरी दिल्लीने मोडून दाखवला असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सामनाच्या अग्रलेखातून टीका करण्यात आली. शिवसेनेच्या तिकीटावर निवडून आलेल्या 18 खासदारांपैकी 12 खासदार सध्या शिंदे गटात विलीन झाले आहेत. त्यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिवसेना सोडली असल्याचे म्हटले आहे.
थोडक्यात बातम्या –
मोठी बातमी! संजय राऊतांना पुन्हा एकदा ईडीचा झटका
नवाब मलिकांना ईडीचा दणका, तुरूंगातील मुक्काम वाढणार?
फोन टॅपिंग प्रकरणी ईडीची सर्वात मोठी कारवाई!
“उद्धव ठाकरेंच्या आदेशानेच मी अजित पवारांवर पातळी सोडून टीका केली”
‘शिंदे गट नाही गटार’; संजय राऊत बंडखोरांवर पुन्हा बरसले
Comments are closed.