बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

समृद्धी महामार्गाला बाळासाहेब ठाकरे यांचंच नाव देण्याचा उद्धव ठाकरेंचा निर्णय!

मुंबई | समृद्धी महामार्गाला शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचंच नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ठाकरे सरकारमधील मंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी ही माहिती दिली आहे.

बाळासाहेबांचं महाराष्ट्राच्या विकासात महत्त्वाचं योगदान आहे. बाळासाहेबांच्या संकल्पेतून गडकरींच्या मार्गदनाखाली मुंबई -पुणे द्रुतगती महामार्ग तयार झाला होता. त्यामुळे गेमचेंजर ठरणाऱ्या समृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्यावं अशी आमची भावना होती, असं शिंदे म्हणाले.

याआधीच्या शासनाचा समृद्धी महामार्ग हा ड्रीम प्रोजेक्ट मानला जायचा. तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस यांनी या महामार्गाला माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचं नाव देण्याची घोषणा केली होती. मात्र आता ठाकरे सरकारने बाळासाहेब ठाकरे यांचंच नाव देण्याचा निर्णय घेतला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी समृद्धी महामार्गाला वाजपेयींचं नाव न दिल्याने आता भाजप आणि शिवसेनेमध्ये जोरदार खडाजंगी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

 

 

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More