Samrudhhi Highway | समृद्धी महामार्ग हा विकासाचा मार्ग म्हणून ओळखला जातो. या महामार्गाच्या माध्यमातून मोठ्या शहरांना जोडण्याचे काम करण्यात आले. मात्र जेव्हापासून हा महामार्ग तयार करण्यात आलाय तेव्हापासून त्यावर बरेच भयानक अपघात झाले आहेत. त्यामुळे नेहमीच अपघात सत्रामुळे या महामार्गाची चर्चा होत असते.
आता पुन्हा एकदा समृद्धी महामार्ग चर्चेत आला आहे. समृद्धी महामार्गावरील (Samruddhi Highway) मुंबई कॉरिडोरवर मेहकर आणि सिंदखेड राजा दरम्यान तुटलेल्या पुलावरील खड्ड्यामुळे तसेच लोखंडी राफ्टरमुळे 3 दिवसांत तब्बल 4 अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे.
समृद्धी महामार्गावरील पुलावर मोठं भगदाड
मेहकर आणि सिंदखेड राजा दरम्यानच्या चेनेज क्रमांक 309 व 310 दरम्यान असलेल्या पुलावर दुरुस्तीसाठी खोदकाम करण्यात आले आहे. या कामामुळे पूलासाठी वापरलेले लोखंड वर आले आहेत. यामुळे गेल्या तीन दिवसांत येथे चार अपघात घडले आहेत.
सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली (Samrudhhi Highway) नसली तरी मोठी घटना घडण्याचीही शक्यता टाळता येणार नाही. तसंच वाहन चालकांना देखील बऱ्याच अडचणी येत आहेत. या महामार्गावरून जाताना वाहनांचा वेग अतिजास्त असतो. अशात मार्गावरील अर्धवट राहिलेल्या कामामुळे मोठी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
तीन दिवसांत 4 अपघात
येथे मोठा अपघात झाल्यास त्याला कोण जबाबदार राहील?, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. 14 जूनला येथे एका एका खासगी बसचा अपघात झाला होता. या अपघातामध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. त्यानंतर आजही सकाळी नागपूरहून मुंबईकडे जाणाऱ्या सियाझ कारला भीषण अपघात झाला.
या कार अपघातमध्ये काही (Samrudhhi Highway) प्रवासी यांना किरकोळ जखमा झाल्या आहेत. त्यामुळे सध्या या महामार्गाच्या दुरुस्तीचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे, अशी मागणी आता जोर धरते आहे. अशा जीवघेण्या खड्ड्यांकडे दुर्लक्ष करून प्रशासनाने आमचा जीव घेण्याचं ठरवलं आहे का?, असा सवाल वाहनचालक उपस्थित करत आहेत.
News Title- Samrudhhi Highway bridge severe pothole
महत्त्वाच्या बातम्या –
‘या’ गोष्टी बायकोसमोर करणं टाळा, अन्यथा पती होईल उद्ध्वस्त
‘त्या’ बॅनरमुळे रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठी खळबळ; थेट राणेंना इशारा?
आनंदवार्ता! सोने-चांदीचा ग्राहकांना मोठा दिलासा, ‘इतक्या’ घरसल्या किंमती