तंत्रज्ञान

  सॅमसंगचा नवा स्मार्टफोन ; कॅमेराच्या ‘या’ नव्या फिचर्स सोबत बरंच काही….

दक्षिण कोरिया  |  जगभरातील लोकप्रिय मोबाईल कंपनी सॅमसंग लवकरच ‘नोट २०’ ही स्मार्टफोन सिरीज ग्राहकांसाठी आणणार आहे. विशेष बाब म्हणजे या स्मार्टफोनमध्ये तब्बल १०८ मेगा पिक्सेलचा कॅमेरा असणार आहे. ऑगस्ट महिन्यात ही सिरीज लाॅन्च केली जाईल, अशी शक्यता वर्तविली जात आहे.

‘गॅलेक्सी नोट अल्ट्रा’ हा या सिरीजमधला पहिला स्मार्टफोन असेल. LTPO OLED डिस्प्ले तर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ८६५ प्लस प्रोसेसर या स्मार्टफोनची खासियत असणार आहे.

मोबाईल घेताना आपण सहसा कॅमेरा क्वालिटी तपासत असतो. ग्राहकांची ही विशेष आवड लक्षात घेता कंपनीनं या सिरिजमध्ये टेलिफोटो आणि अल्ट्रावाईड कॅमेराचाही समावेश केला आहे. कॅमेरा लेन्स सोडून बाकीचे फिचर्स हे नोट २० प्लस सारखेच असतील, असंही कंपनीकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

माहितीनुसार, सॅमसंगच्या या नव्या स्मार्टफोन्स सोबतच इतर अनेक माॅडेल्सही कंपनी लाॅन्च करणार आहे. यामुळे मोबाईल घेण्याचा विचार करणार असाल तर ग्राहकांसाठी हा चांगला पर्याय असू शकतो, असं तज्ञांच म्हणणं आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

अ‍ॅपल आणि गुगलचा TikTok ला दणका; घेतला ‘हा’ मोठा निर्णय

“या युद्धात शरद पवार यांनी एक काडी टाकली अन्…..”

महत्वाच्या बातम्या-

राष्ट्रभक्तीचा मक्ता कुणी एका पक्षाने घेतलेला नाही- संजय राऊत

…तर बंदीसाठी 20 जवानांच्या बलिदानाची वाट पाहात होता का?- संजय राऊत

टिकटॉकवरच्या बंदीनंतर कंपनीची प्रतिक्रीया, म्हणाले…

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या