सॅमसंग कंपनीने लाँच केला स्वस्तात मस्त फोन; जाणून घ्या किंमत

New Phone l सॅमसंग कंपनीने एक नवीन स्मार्टफोन भारतीय बाजारात लाँच केला आहे. या फोनला Samsung Galaxy A06 असे नाव देण्यात आले आहे. सॅमसंगच्या अधिकृत वेबसाइटवर हा फोन लिस्ट करण्यात आला आहे. या हँडसेटमध्ये अनेक चांगले फिचर्स देण्यात आली आहे.

काय आहेत फीचर्स :

Samsung Galaxy A06 मध्ये 50MP कॅमेरा आणि 500mAh बॅटरी आहे. या हँडसेटची सुरुवातीची किंमत 9,999 रुपये ठेवण्यात आली आहे, ज्यामध्ये 64GB स्टोरेज उपलब्ध आहे. याशिवाय, त्याचा 4GB + 128 GB व्हेरिएंट 11,499 रुपयांना उपलब्ध असणार आहे. सॅमसंग A सीरीजचा हा फोन सॅमसंग इंडिया ई-स्टोअरवर उपलब्ध आहे. येत्या काही दिवसांत ते ई-कॉमर्स स्टोअर्सवरही उपलब्ध करून दिला जाणार आहे.

Samsung Galaxy A06 मध्ये 6.7 इंचाचा IPS LCD पॅनेल आहे, जो HD+ रिझोल्यूशनसह येतो. यामध्ये यूजर्सना 60 HZ चा रिफ्रेश रेट मिळतो. या हँडसेटमध्ये MediaTek Helio G85 चिपसेट आणि Mali-G52 MP2 GPU वापरण्यात आला आहे. फोनमध्ये 4 GB रॅम आणि 128 GB इंटरनल स्टोरेज आहे. याव्यतिरिक्त, त्यात 1 TB पर्यंतचे मायक्रोएसडी कार्ड ऍड केले जाऊ शकते.

New Phone l कॅमेरा फीचर्स काय आहेत? :

Samsung Galaxy A06 मध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात 50MP प्राथमिक कॅमेरा आणि 2MP ड्युएल कॅमेरा आहे. हा सॅमसंग फोन 8 MP सेल्फी कॅमेरासह येत आहे. Samsung Galaxy A06 स्मार्टफोनमध्ये 5000 mAh बॅटरी आहे, जी 25W फास्ट चार्जिंगसह येते. तेच यामध्ये ब्लूटूथ v5.3 GPS आणि USB Type-C पोर्ट देखील आहे.

हा फोन One UI 6.1 आधारित Android 14 वर काम करतो. या हँडसेटला तीन वर्षांसाठी दोन ओएस अपडेट्स आणि सिक्युरिटी अपडेट्स मिळतील. इतर फीचर्सबद्दल बोलायचे झालेतर, यात साइड माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर आणि फेस अनलॉक सिस्टम देण्यात आली आहे.

News Title : Samsung Galaxy A06 Smartphone Launched

महत्वाच्या बातम्या-

गुड न्यूज! पेट्रोल-डिझेल होणार स्वस्त?, समोर आली मोठी अपडेट

अजित पवार कुणाला करणार आमदार?, विधान परिषदेसाठी ‘या’ 3 नावांची चर्चा

खबरदार… विसर्जनानंतर बाप्पाचे फोटो काढाल तर पस्तावाल, पोलिसांचे आदेश काय ?

“काढणीला आलेलं पीक गेलं, सरकारने आता लाडका शेतकरी..”; राज ठाकरेंचं आवाहन

पवार साहेबांनी ‘या’ मतदारसंघातील उमेदवार केला जाहीर; बड्या नेत्याला देणार टक्कर