Samsung Galaxy M05 l सॅमसंग कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी दिली आहे. कंपनीने सर्वात स्वस्त स्मार्टफोन लाँच केला आहे, ज्याची किंमत अवघ्या दहा हजारांपेक्षा कमी असणार आहे. कंपनीने Samsung Galaxy M05 हा 5G फोन भारतात लाँच केला आहे. या फोनमध्ये कंपनीने 64GB स्टोरेजसह 5000mAh ची पॉवरफुल बॅटरी दिली आहे.
कॅमेरा फीचर्स काय असणार? :
Samsung Galaxy M05 या स्मार्टफोनच्या फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, Galaxy M05 मध्ये मोठा 6.7-इंचाचा HD+ डिस्प्ले दिला आहे. ही मोठी स्क्रीन व्हिडिओ पाहण्यासाठी, गेम खेळण्यासाठी किंवा सोशल मीडिया ब्राउझ करण्यासाठी उत्तम आहे. कंपनीने फोटोग्राफीसाठी फोनमध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप दिला आहे.
यामध्ये 50 MP वाइड-एंगल लेन्स देखील दिली आहे, जी F/1.8 अपर्चरसह येते, जे कमी प्रकाशातही स्पष्ट आणि छान फोटो कॅप्चर करू शकते. याशिवाय यामध्ये एक 2MP डेप्थ-सेन्सिंग कॅमेरा देखील आहे, जो फोटोंची स्पष्टता सुधारतो. तसेच सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी फोनमध्ये 8MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.
Samsung Galaxy M05 l किंमत काय असणार? :
कंपनीने हा फोन MediaTek Helio G85 प्रोसेसरने सुसज्ज आहे. पॉवरसाठी, Galaxy M05 मध्ये 5000mAh ची शक्तिशाली बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी 25W फास्ट चार्जिंगला देखील सपोर्ट करते. Samsung Galaxy M05 5G मध्ये कंपनीने 4GB रॅम सह 64GB इंटरनल स्टोरेज दिले आहे. यात मायक्रोएसडी कार्ड स्लॉट देखील आहे, ज्याच्या मदतीने फोनचे स्टोरेज 1TB पर्यंत वाढवता येते. कंपनीने हा फोन मिंट ग्रीन कलरमध्ये लॉन्च केला आहे.
कंपनीने Samsung Galaxy M05 5G ची किंमत 7999 रुपये ठेवली आहे. कंपनीच्या अधिकृत वेबसाइट व्यतिरिक्त, तुम्ही ते ई-कॉमर्स साइट Amazon वरून देखील खरेदी करू शकता. अशा परिस्थितीत हा एक बजेट फ्रेंडली स्मार्टफोन आहे ज्यामध्ये लोकांना अनेक चांगले फीचर्स मिळत आहेत.
News Title : Samsung Galaxy M05 Launched
महत्वाच्या बातम्या-
हार्दिक पांड्याच्या आयुष्यात नव्या मुलीची एन्ट्री?, नताशा म्हणाली…
आज ‘या’ जिल्ह्यांना पाऊस झोडपणार, उर्वरित भागात काय आहे स्थिती?
शेअर बाजारात नवा स्कॅम; ‘या’ व्हॉट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून होतेय फसवणूक
अजितदादांना मोठा झटका, कट्टर समर्थक शरद पवारांच्या गळाला?
सरकारकडून सर्वसामान्यांना मिळणार मोठं गिफ्ट, पेट्रोल-डिझेल होणार स्वस्त?