मनसेच्या गुंडांनी पुन्हा एकदा मार खाल्ला- निरुपम

मुंबई | मनसेच्या गुंडांनी काल पुन्हा एकदा मार खाल्ला, असं काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी म्हटलंय. ट्विटरवर त्यांनी केलेल्या ट्विटमुळे पुन्हा मोठा राडा होण्याची शक्यता आहे. 

आम्ही हिंसेवर विश्वास ठेवत नाही. मात्र मनसेचे गुंड रोज जर फेरीवाल्यांच्या पोटावर लाथ मारत असतील तर पोलिसांच्या समोरच अॅक्शनवर रिअॅक्शन होणार, असं संजय निरुपम यांनी म्हटलंय. 

विक्रोळीत मराठी पाट्यांसंदर्भात दुकानदारांना निवेदन देण्यात येत होतं. तेव्हा वाद झाल्यानं स्थानिक दुकानदार आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांना बेदम मारहाण केली. त्यापार्श्वभूमीवर निरुपम यांनी हे ट्विट केलंय.