महाराष्ट्राच नव्हे, गोव्यातही शिवसेना स्वबळावर लढणार!

मुंबई | आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा शिवसेनेने केली होती. त्याचाच एक भाग म्हणून गोव्यात होणाऱ्या 2 लोकसभेच्या जागांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा शिवसेनेने केलीय. 

खासदार संजय राऊत यांनी यासंदर्भात माहिती दिलीय. गोवा लोकसभेच्या दोन्ही जागा लढवण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मान्यता दिली असल्याचं त्यांनी सांगितलं. 

दरम्यान, गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना दिल्लीची हवा मानवली नाही. त्यांची प्रकृती लवकर बरी व्हावी, अशी सदिच्छाही संजय राऊत यांनी व्यक्त केली.