राहुल गांधी यांचं यश कौतुकास्पद!, शिवसेनेनं पाठ थोपटली

मुंबई | काँग्रेसने गुजरातमध्ये मिळवलेले यश कौतुकास्पद आहे, असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
जसे राहुल गांधी यांच्यामुळे नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले तसाच भाजपचा आश्वासनांचा फुगवटा काँग्रेसच्या यशास कारणीभूत आहे, असंही ते म्हणाले.
दरम्यान, राहुल यांच्या यशात भाजपच्या निष्क्रियतेचा हात आहे. गुजरातपेक्षा महाराष्ट्रात वातावरण खराब आहे, असा दावाही त्यांनी यावेळी केला.