बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

संजय राऊतांकडून बंडखोर आमदारांचा डुक्कर असा उल्लेख, म्हणाले…

मुंबई | एकनाथ शिंदेच्या बंडानंतर राज्यातील राजकारणात खळबळ उडाली आहे. यातच पत्रकार परिषदेत शिवसेना प्रवक्ते खासदार संजय राऊत यांची जीभ घसरल्याचं पहायला मिळाल. एकनाथ शिंदे यांच्या सोबत असलेल्या आमदारांचा उल्लेख त्यांनी डुकरं असा केला आहे.

गुवाहाटीत काय आहे? गुवाहाटीत कामाक्षी देवीचं मंदिर आहे. तिकडे रेड्यांचा बळी दिला जातो डुकरांचा नाही. डुकरांचा बळी महाराष्ट्रात दिला जातो. आपल्याकडे महाराष्ट्रात असंख्य देवदेवतांना हा नैवेद्य लागतो, पण आता महाराष्ट्रातील 40 डुकरं गुवाहाटीत गेली आहेत, असं राऊतांनी म्हटलंय.

ज्या पक्षाने शिवसेनेला संपवण्याचा विडा उचलला आहे त्यांना तुम्ही मांडी लावून बसता अशी टिकाही एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांच्या भेटीवर केली. बंडखोर आमदारांना समजवण्याचा प्रयत्न मी केला. मात्र त्यांनी ऐकलं नाही. आम्ही बाळासाहेब ठाकरेंना मानतो आणि तुम्ही त्यांचा देवधर्म पळवता? ही तर अफजलखानाची औलाद आहे, असं एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेल्या आमदारांविषयी माध्यामांशी बोलताना ते म्हणाले.

तसेच बंडखोर आमदारांना नाराजीचं कारण विचारलं असता ते संजय राऊतांचं नाव पुढे करत आहेत. एकनाथ शिंदेच्या बंडानंतर शिंदे गट आणि शिवसेनेतील दरी वाढत आहे. हे बंड आता भारतात नाही तर जगभराच चर्चेचा विषय ठरत आहे. गुगलवर सध्या एकनाथ शिंदे यांना प्रंचड प्रमाणात सर्च केलं जात आहे.

थोडक्यात बातम्या

मोठी बातमी! राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होणार?

एकनाथ शिंदे दारुच्या नशेत?; ‘तो’ व्हिडीओ सोशल मीडियावर होतोय व्हायरल

‘आता तर ते दिसतही नाहीत’; बंडाची आठवण करून देत आदित्य ठाकरेंचा राज ठाकरेंना टोला

“देवा लवकर आटप रे सगळं, हॉटेलचं बिल वाढतंय”

“…पण त्यांनी शिवसैनिकांच्या आईवर हात घातला आहे, ते कसे शांत राहातील”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More