Top News महाराष्ट्र मुंबई

“…तर त्यांना ईडीच्या कार्यालयासमोर जोड्याने मारलं नाही तर माझं नाव संजय राऊत नाही”

मुंबई | भाजप नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेनेवर गंभीर आरोप केले आहेत. याच पार्श्वभूमीवर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

शिवसेना सोमय्या यांच्या विरोधात अब्रुनुकसानीचा खटला दाखल करणार असल्याचं संजय राऊत यांनी सांगितलं आहे. एबीपी माझाशी ते बोलत होते.

अब्रुनुकसानीचे खटले वैगैरे ठीक आहे ते न्यायालयात जाईल पण आरोप सिद्ध झाले नाही तर ईडीच्या कार्यालयासमोर या आरोप करणाऱ्यांना जोड्याने मारलं नाही तर माझं नाव संजय राऊत नाही, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

दरम्यान,  ज्या पद्दतीने ही मंडळी अफाट, बेफाट, तोंडफाट आरोप करत सुटले आहेत त्यातून काही निष्पन्न होणार नाही.  काहीही कागदं फडकवतात आणि आरोप करतात. हिंमत असेल तर आरोप सिद्ध करून दाखवा, असं आव्हानही राऊतांनी केलं आहे.

थोडक्यात बातम्या-

विराट झाला ‘बाप’माणूस! विरूष्काच्या घरी नव्या पाहुणीचं आगमन

भंडारा रुग्णालय दुर्घटनेमधील पीडित कुटुंबीयांना मोदी सरकारकडून ‘इतक्या’ लाखांची मदत जाहीर!

‘हनुमा विहारीनं क्रिकेटची हत्या केली’; भाजप खासदाराचं वक्तव्य

“…तर संजय राऊतांनी राहुल गांधींना सल्ले द्यावे, दोघांची वैचारिक उंची सारखी आहे”

MPSC कडून विविध पदांच्या पूर्व परीक्षांचं नवीन वेळापत्रक जाहीर!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या