बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

संभाजी भिडे, मिलिंद एकबोटे यांना जिल्हाबंदी

पुणे | कोरेगाव भीमा येथे एक जानेवारीला विजयस्तंभ अभिवादन समारंभ होणार आहे. या दिवशी शिव प्रतिष्ठानचे संभाजी भीडे आणि हिंदू एकता आघाडीचे मिलिंद एकबोडे यांना पुण्यात जिल्हाबंदी करण्यात येणार आहे. पोलीस अधिक्षक संदीप पाटील यांनी याबाबतची माहिती दिली आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात या कार्यक्रमाच्या निमित्ताने बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी भीडे आणि एकबोटे यांना जिल्हाबंदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कार्यक्रम सुरळीतपणे होण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे आणि त्या दिशेनं आम्ही काम करत आहोत, असं जिल्हाधिकारी नवल किशोर राम म्हणाले आहेत.

भीडे आणि एकबोटे यांना 28 डिसेंबर ते 1 जानेवारी या कालावधीसाठी जिल्हाबंदी करण्यात आली आहे. नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देऊन कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रशासनाने नियोजन केले आहे, असं प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.

दरम्यान, 1 जानेवारी 2018 साली कोरेगाव भीमाच्या लढाईला 200 वर्षे पूर्ण झाली होती. यावेळी विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी लाखोंच्या संख्येनं लोक जमले होते. पण या कार्यक्रमाला हिंसाचाराचे गालबोट लागले होते. त्यामुळे पोलिसांकडून खबरदारी घेतली जात आहे.

 

महत्वाच्या बातम्या-

 

 

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More