बेळगाव | शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्याविरोधात अटक वाॅरंट जारी करण्यात आला आहे. आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी आत्तापर्यंतच्या सगळ्या सुनावणीवेळी गैरहजर राहिल्याने बेळगावमध्ये हे अटक वाॅरंट जारी करण्यात आले आहे.
गेल्यावर्षी 13 एप्रिल 2018 रोजी बेळगाव शहराजवळील येळ्ळूर या गावात महाराष्ट्र मैदानात कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आचारसंहिता लागू असूनही भिडे यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांना निवडून द्या असं आवाहन आपल्या भाषणातून केलं होतं.
आचारसंहितेचा भंग केल्यामुळे निवडणूक आयोगाने संभाजी भिडे यांच्यासह इतर नऊ जणांविरोधात बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.
दरम्यान, याप्रकरणी होत असलेल्या सगळ्या सुनावणीवेळी संभाजी भिडे गैरहजर राहिले आहेत. त्यामुळे त्यांच्याविरोधात अटक वाॅरंट जारी करण्यात आला असून पुढील सुनावणी 24 मार्चला होणार आहे.
ट्रेंडिंग बातम्या-
नरेंद्र मोदी पाठीवर दंडे खातील पण तरूणांना रोजगार देणार नाहीत- नितीन राऊत
उद्धवजी, कृपया तो निर्णय घेऊ नका; बहिणीची भावाला विनंती
महत्वाच्या बातम्या-
शेतकरी कर्जमाफीच्या हिशोबात बँकाकडून गडबडी?
इंटरनेट हा मूलभूत अधिकार नाही- रविशंकर प्रसाद
भावाशी, मिसळचं झटको होयो तर येवा वैभववाडीत!
Comments are closed.