बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

देशातल्या मुसलमानांकडून राष्ट्रवादाची अपेक्षा करणं वेडेपणा- संभाजी भिडे

सांगली | मुस्लीम समाज देशाचा नागरिक आहे. मात्र त्यांच्यामध्ये राष्ट्रीयत्वाचा अभाव आहे. राष्ट्रवादाच्या बाबतीत हिंदू समाज नपुंसक आहे, तर देशातल्या मुसलमानांकडून राष्ट्रवादाची अपेक्षा करणं वेडेपणा आहे, असं वादग्रस्त वक्तव्य शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी केलं आहे. ते सांगलीतील एका कार्यक्रमात बोलत होते.

संभाजी भीडे यांनी नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोध करणाऱ्यांवर टीका केली आहे. नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोध करणारे देशद्रोही आहेत. आपला देश माणसांचा आहे, पण देशभक्तांचा नाही हे देशाचं दुर्दैव आहे, असंही ते म्हणाले आहेत.

नागरिकत्व कायद्यामुळे कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत सर्वांनाच आनंद व्हायला पाहिजे. जे खरे देशभक्त आहेत त्यांना या कायद्याने नक्कीच आनंद होईल. स्वार्थ हाच धर्म असणारे या कायद्याला विरोध करत आहेत, असंही ते म्हणाले आहेत.

दरम्यान, नागरिकत्व कायद्याच्या पार्श्वभूमीवर भीडे यांनी अनेक वादग्रस्त वक्तव्य केली आहेत. त्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या-

 

 

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More