बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

वांझोट्या बाईला स्त्रीत्व नसतं; संभाजी भिडेंचं वादग्रस्त वक्तव्य

पुणे | आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे कायम चर्चेत राहणारे शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भीडे यांनी स्त्रीयांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलं आहे. वांझोट्या बाईला स्त्रीत्व नसतं, असं खालच्या पातळीचं वक्तव्य भीडे यांनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यावर समाज माध्यमातून तीव्र पडसाद उमटत आहेत.

जसं नपुंसकात पुरुषत्व कमी असतं, तस वांझेमध्ये स्त्रीत्व कमी असतं. त्यांना आपण नपुंसक आणि वांझ असे शब्द वापरतो. तसंच हिंदूंचं आहे. हिंदूंमध्येही राष्ट्रीयत्वाच्या बाबतीत पुरुषत्व आणि स्त्रीत्व कमी आहे. राष्ट्रीयत्वाच्या बाबतीत हिंदू समाज शंभर टक्के नपुंसक आणि वांझ आहे, असं वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केलं आहे.

राष्ट्रीय नागरिक नोंदणी आणि नागरिकत्व सुधारणा कायद्यावर बोलताना भिडे यांनी राष्ट्रीयत्वाचा मुद्दा उपस्थित केला आहे. या कायद्याला विरोध करणारे देशद्रोही आहेत. त्यांच्यात राष्ट्रवादाची कमतरता असून ते नपुंसक आहेत, असं वक्तव्य त्यांनी केलं आहे.

दरम्यान, भिडे यांच्या या वक्तव्याचा सर्व स्तरांतून निषेध केला जात आहे. भिडे यांची याआधीही अनेकदा जीभ घसरली आहे.

महत्वाच्या बातम्या-

 

 

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More