बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“आमची कला म्हणजे तमाशा आणि त्यांची नटश्रेष्ठ”

मुंबई |  मराठी मनोरंजन सृष्टीत मुख्य भूमिकेत नेहमी ब्राह्मण मुली दिसतात. इतर मुली का दिसत नाहीत? असा सवाल दिग्दर्शक सुजय डहाके याने केला बोता. यामुळे मोठा वाद सुरु झाला आहे. अनेकांनी सुजयवर टीका केली आहे. यातच संभाजी ब्रिगेड त्याच्या समर्थनासाठी पुढे आली आहे.

आमची कला म्हणजे तमाशा आणि साडेतीन टक्के वाल्यांची कला म्हणजे ‘नटश्रेष्ठ’, असं परखड मत पुण्याचे संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे यांनी व्यक्त केलं आहे. त्यांनी फेसबुक पोस्ट करत सुजयचं कौतुक केलंय तर टीका करण्याऱ्यांना सुनावलं आहे.

मालिकेत दिसणारी नावे ही तीन टक्केवाल्यांना अनुसरुन असतात. सर्वकाही आडनावावरुन ठरत असतं. आमच्या मुलांची नावे स्पॉटबॉय आणि स्पेशल थँक्सच्या यादीमध्ये दिसतात. त्यामुळे सुजय जे बोलला ते सर्व खरं आहे, असं ते म्हणाले आहेत.

जोपर्यंत लिहिणारा, बोलणारा आणि सांगणारा बहुजनांचा असणार नाही, तोपर्यंत आपण इतिहास घडवू शकणार नाही. इतिहास आपला असूनही काही उपयोग नाही, असंही शिंदे म्हणाल्या आहेत.

ट्रेंडिंग बातम्या-

पोलिसांनी शिवाजी महाराज आणि जिवा महालाचा आदर्श घ्यावा- अजित डोवाल

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वगळता कुणीही पत्राला उत्तर दिलं नाही”

महत्वाच्या बातम्या-  

…म्हणून शरयुच्या आरतीमध्ये उद्धव ठाकरे सहभागी होणार नाहीत!

शंभर दिवसांत ठाकरे सरकारचे 20 महत्वपूर्ण निर्णय; वाचा एका क्लिकवर

जनाची नाही किमान मनाची तरी…; मुख्यमंत्र्यांच्या अयोध्या दौऱ्यावरुन मनसेची बोचरी टीका

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More