Top News महाराष्ट्र मुंबई

“तुमची ती नाईट लाईफ आणि जनतेची पार्टी करो ना!”

मुंबई | नव्या कोरोना व्हायरसने डोक वर काढलं आहे. ब्रिटमनध्ये या नव्या कोराना व्हायरसचा सर्व जगाला धसका घेण्याजोगा संसर्ग पसरत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने पब, बार, क्लब आणि रेस्टॉरंट चालकांना कडक सूडना दिल्या. अशातच काल मुंबई पोलिसांनी मध्यरात्री एका पबवर कारवाई केली.

मुंबई पोलिसांनी कोरोनाशी संबधित नियमांचं पालन न केल्याने तसंच वेळमर्यादा संपल्यानंतरही क्लब सुरु ठेवण्यात आल्याने ही कारवाई करण्यात आली असल्याचं सांगितलं. यासंदर्भात मुंबई पोलिसांनी ट्विट केलं होतं. पार्टी (नहीं) चलेगी टिल सिक्स इन द मॉर्निंग!’, असं ट्विटमध्ये म्हटलं होत.

मुंबई केलेल्या या कारवाईवरून मनसे नेते संदीप देशपांडे यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. तुमची ती नाईट लाईफ आणि जनतेची पार्टी करो ना!, असं संदीप देशपांडे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं होतं.

दरम्यान, राज्याचे मंत्री आदित्य ठाकरे हे मुंबईत नाईट लाइफ सुरू करण्यासाठी आग्रही होती.

 

 

थोडक्यात बातम्या-

काँग्रेसला मोठा धक्का! 16 नगरसेवकांनी काँग्रेसला हात दाखवत पवारांच्या उपस्थितीत हाती बांधल घड्याळ

“आपल्या देशातील शेतकऱ्यांची अशी अवस्था आहे त्याअर्थी देश खूप मागे चालला आहे”

“पवार साहेब कोणाला बसवलं महाराष्ट्राच्या डोक्यावर तुम्ही?”

“उद्धव ठाकरे आपल्या देशाचे पंतप्रधान होण्यासारखं दुर्भाग्य दुसरं नाही”

“उद्धव ठाकरेंना 50 वर्ष मुख्यमंत्री राहण्यासाठी शुभेच्छा”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या