“ज्यांचा आदर्श दाऊद आहे त्या मटण करींना छत्रपतींबद्दल बोलण्याचा अधिकारच नाही”
मुंबई | छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तिथीनुसार जयंतीनिमित्त मनसेकडून (MNS) दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्कवरील शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अभिवादन करत पुष्पवृष्टी करण्यात आली. यावरून राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी मनसेवर निशाणा साधला.
अमोल मिटकरी यांनी मनसेवर टीका केल्यानंतर मनसेचे अमेय खोपकर (Amey Khopkar) यांनी मिटकरींवर सडकून टीका केली. दिवाळी, गणपती या हिंदु सणांप्रमाणे शिवजयंतीही आमच्यासाठी सण असल्याचंही खोपकर म्हणाले. त्यानंतर आता मनसेचे संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी मटन करी असा उल्लेख करत मिटकरींना टोला लगावला आहे.
जो पक्ष दाऊदच्या माणसांना विमानातून फिरवतो. ज्यांचा मंत्री दाऊदला पैसे पुरवतो, ज्यांचा आदर्श दाऊद आहे त्या मटण करींना छत्रपतींबद्दल बोलण्याचा अधिकारच नाही, असं ट्विट करत संदीप देशपांडे यांनी अमोल मिटकरींवर निशाणा साधला आहे.
दरम्यान,शिवजयंती ही 19 फेब्रुवारीलाच साजरी व्हायला हवी. रोज साजरी झाली तरी हरकत नाही. परंतु आज जी जयंती साजरी केली जात आहे ती मतांसाठी साजरी केली जातेय, असा घणाघात अमोल मिटकरी यांनी केला होता. तर तुमचा वाढदिवस तिथीनुसार साजरा करता का? मनसेचा वर्धापन दिन तिथीनुसार साजरा करतात का? असा सवाल देखील मिटकरींनी उपस्थित केला होता.
जो पक्ष दाऊद च्या माणसांना विमानातून फिरवतो, ज्यांचा मंत्री दाऊद ला पैसे पुरवतो, ज्यांचा आदर्शच दाऊद आहे त्या मटण करीं ना छत्रपतीं बद्दल बोलण्याचा अधिकारच नाही.
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) March 21, 2022
थोडक्यात बातम्या-
महागाईचा भडका, पेट्रोल-डिझेल पाठोपाठ घरगुती गॅस सिलेंडर महागलं
कोरोना व्हायरसबद्दल तज्ज्ञांनी केलेल्या धक्कादायक दाव्याने खळबळ
मोठी बातमी! पेट्रोल-डिझेलच्या किमतीत वाढ, जाणून घ्या आजचे ताजे दर
“वहिनीसाहेबांचा आग्रह असेल तर तो आग्रह आम्ही पाळू”
“उरलेले दोन तास सुद्धा मोदींना झोपू द्यायचं हे नाही त्यांनी ठरवलंय”
Comments are closed.