बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“‘सामना’कार रशिया आणि युक्रेनमध्ये मध्यस्थी साठी रवाना, झुकेगा नहीं साला”

मुंबई | पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीत भाजपला (BJP) घवघवीत यश मिळालं. पाच पैकी चार राज्यात भाजपचा बोलबाला असल्याचं पाहायला मिळालं. या पाच राज्यातील निकालांवरून महाराष्ट्रात देखील राजकारण रंगायला सुरूवात झाली आहे. (Assembly Election Result 2022)

गोवा, उत्तर प्रदेश आणि मणिपूर या राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात शिवसेना (Shivsena) संपूर्ण ताकदीने उतरली होती. मात्र, या राज्यात शिवसेनेचा फ्लॉप शो झाल्याचं पाहायला मिळालं. तर शिवसेना उमेदवाराचं डिपॉझिट जप्त झाल्याचंही समोर आलं. यावरून महाराष्ट्रात शिवसेनेवर जोरदार टीका केली जात आहे.

मनसेचे संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी यावरून शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर निशाणा साधला आहे. उत्तर प्रदेश आणि गोव्याच्या घवघवीत यशानंतर ‘सामना’कार रशिया आणि युक्रेनमध्ये मध्यस्थी साठी रवाना, झुकेगा नहीं साला, असं ट्विट करत संदीप देशपांडेंनी राऊतांना चिमटा काढला आहे.

दरम्यान, राऊत साहेबांनी आंतरराष्ट्रीय राजकारणात गेलं पाहिजे. त्यांनी रशिया (Russia) आणि युक्रेन मध्ये (Ukraine) मध्यस्थी करून काहितरी मार्ग काढला पाहिजे, असा खोचक टोला संदीप देशपांडेंनी राऊतांना लगावला आहे.

 

थोडक्यात बातम्या-

“सेक्सी आणि हॉट म्हणून ओळखलं जाणं मला आवडतं”

पुतिन यांनी मोडला तब्बल 70 वर्षांपूर्वीचा ‘हा’ रेकॉर्ड

‘आप’ संदर्भात गोपीनाथ मुंडेंनी केलेली ‘ती’ भविष्यवाणी चर्चेत; पाहा व्हिडीओ

मुंबईतील कपलचा खुल्लम-खुल्ला प्यार, kiss करतानाचा व्हिडीओ व्हायरल; पाहा व्हिडीओ

तब्बल दोन वर्षांनी पंतप्रधान मोदी त्यांच्या आईच्या भेटीला, फोटो सोशल मीडियावर व्हायरल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More