बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“कोरोना महाराष्ट्र सरकारचा व्हायरस म्हणून जगात ओळखला जाईल”

मुंबई | आपल्याला मुळात तिसरी लाट येऊच द्यायची नाही, जनतेच्या आरोग्याला प्रथम प्राधान्य द्या, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. तसेच सणांच्या पार्श्वभूमीवर निर्बंधही लादण्यात आले आहेत. त्यावरुन मनसेनं पुन्हा एकदा ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.

महाराष्ट्रात करोनाच एवढं स्तोम माजवल जातंय की, यापुढे करोना हा चायनीज व्हायरस ऐवजी महाराष्ट्र सरकार व्हायरस म्हणून जगात ओळखला जाईल. सरकारने कोरोना संबधित सर्व डेटा जनतेबरोबर पारदर्शकपणे शेअर केला पाहिजे, असं संदीप देशपांडे यांनी म्हटलंय.

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी देखील काही दिवसांपूर्वी राज्य सरकारवर टीका केली होती. तुमच्या राजकीय पक्षांच्या कार्यक्रमांना गर्दी चालते. फक्त दहीहंडी आणि गणेशोत्सवालाच गर्दी नको, ही कोणती पद्धत?, असा सवाल राज ठाकरे यांनी ठाकरे सरकारला केला होता.

लॉकडाऊनमुळे जे चाललं ते बरं चाललं असं सर्व सरकारला वाटतंय. आंदोलने नाही, मोर्चे नाही, सरकारच्या विरोधात कोणी बोलायचं नाही, रस्त्यावर कुणी उतरायचं नाही. काही झंझटच नाही. आपले आपले पैसे कमवा, आपली आपली दुकाने चालवा. बरं चाललंय सरकारांचं, अशी टीका राज ठाकरेंनी केलीये.

थोडक्यात बातम्या- 

मन सुन्न करणारी घटना; वाढदिवसाच्या दिवशीच 24 वर्षीय तरुणासह मित्राचा मृत्यू

‘या’ पाच जिल्ह्यांनी सतर्क रहावं; आरोग्यमंत्री राजेश टोपेंचं आवाहन

“राहुल गांधी हे सध्याच्या भारतीय राजकारणातील राजकीय कुक्कू”

सिद्धार्थ शुक्लाला होतं ‘हे’ व्यसन; लंडनला जाऊन घेणार होता उपचार

भररस्त्यात गाडीवर कपलचे अश्लील चाळे, व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More