Top News

मुख्यमंत्रिपद अजितदादाच सांभाळतात, खरे मुख्यमंत्री तर…- संदिप देशपांडे

मुंबई | महाराष्ट्रातील किंवा देशातील सध्याच्या विरोधी पक्षाची स्थिती पाहता ‘शॅडो’ कॅबिनेटचा प्रयोग म्हणजे ‘हा खेळ सावल्यांचा’ नाट्यप्रयोग ठरू नये, असा टोला शिवसेनेनं मनसेला लगावला आहे. यालाच मनसे नेते संदिप देशपांडे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

मुख्यमंत्रिपद अजितदादाच खऱ्या अर्थाने सांभाळत असल्यामुळे खरे मुख्यमंत्री दहा ते पाचच काम करतात, असं म्हणत संदिप देशपांडे यांनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं आहे. त्यांनी यासंदर्भात एक ट्विट केलं आहे.

एकही महत्वाचं खातं नसलेले महाराष्ट्रातले पाहिले मुख्यमंत्री सध्या शॅडो म्हणूनच काम करतायत त्यामुळे शॅडो मुख्यमंत्रिपद देऊन वेळेचा अपव्यय कशासाठी असा विचार राजसाहेबांनी केला असावा, असं संदिप देशपांडे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात विनोद शिल्लक आहे. मात्र राजकारणात विनोदाला वावडं नाही हे पुन्हा दिसलं, असंही अग्रलेखात म्हटलं आहे.

 

ट्रेंडिंग बातम्या-

राज्यसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून शरद पवार,फौजिया खान अर्ज भरणार

मध्य प्रदेश सत्तानाट्याला नवा ट्विस्ट; आता कमलनाथ म्हणतात…

महत्वाच्या बातम्या-

“तुम्ही हाफ चड्डीत होता तेव्हापासून शरद पवार फूल पॅण्ट वापरतात”

…नाहीतर जिल्हाधिकारी कार्यालयात कोंबड्या आणून सोडू- रविकांत तुपकर

कोरोना गो नाही, तर मग काय कोरोना या, असं म्हणू का?- रामदास आठवले

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या