बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“तुमची घरं वसुलीवर चालतात, पण सामान्य जनतेला नोकरी, उद्योगधंदे करून घर चालवावं लागतं”

मुंबई | महाराष्ट्रात सध्या कोरोनाच्या नव्या विषाणूने डोकं वर काढायला सुरुवात केली असतानाच राज्य सरकारतर्फे परत एकदा निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी सरकारवर विरोधकांतर्फे सडकून टीका होत असताना पाहायला मिळत आहे. त्यातच मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीकेचे बाण सोडले आहेत.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी ट्विट करून महाविकास आघाडी सरकारला लॉकडाऊनवरून चांगलंच सुनावलं आहे. “तुमची घरं वसुलीवर चालतात, पण सामान्य जनतेला नोकरी, उद्योगधंदे करून घर चालवावं लागतं”, अशा शब्दात संदीप देशपांडे यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी ‘महावसुली सरकार सामान्य जनतेचा विचार कधी करणार?’ असा प्रश्न ट्विटरच्या माध्यमातून उपस्थित करत सरकारला टोला लगावला आहे. संदीप देशपांडे हे महाविकास आघाडी सरकारवर टीका करण्याची एकही संधी गेल्या काही दिवसांपासून सोडत नसल्याचं पाहायला मिळत आहे.

संदीप देशपांडे यांनी केलेल्या टीकेला ठाकरे सरकारतर्फे नेमकं काय प्रत्युत्तर मिळणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तसेच यापूर्वीही अनेक वेळा संदीप देशपांडे यांनी विविध विषयांवरून ठाकरे सरकारवर निशाणा साधल्याचं दिसून आलं.

थोडक्यात बातम्या

मराठमोळ्या राहीनं पटकावलं गोल्ड मेडल; देशाला पहिलं सुवर्णपदक

पुण्यात आजपासून संचारबंदी लागू; ‘या’ वेळेत विनाकारण फिरणाऱ्यांवर होणार कारवाई 

“डबल इंजिन सरकारने बिहारमधील सर्व जिल्ह्यांमध्ये 100 रुपये लिटर पेट्रोल केल्याबद्दल अभिनंदन”

होय, मी भक्त आहे आणि मला अभिमान आहे – अमृता फडणवीस

दिलासादायक! महाराष्ट्रात कोरोना रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात घट, वाचा आजची आकडेवारी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More