”आता ठाकरेंचा मोठा घोटाळा बाहेर येणार”

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | भाजप नेेते किरीट सोमय्यांनी (Kirit Somayya) महाविकास आघाडीतील नेत्यांचे घोटाळे बाहेर काढण्याचा जणू पणच केला आहे. त्यातच आता ठाकरे गटाचा आणखीन एक मोठा घोटाळा बाहेर येणार असल्याची चित्र दिसत आहेत. पण तो घोटाळा किरीट सोमय्या नाही तर मनसे नेते देशपांडे बाहेर काढणार आहेत.

2023 मध्ये होणाऱ्या मुबंई (Mumbai) महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी सगळ्याच पक्षांनी रणशिंग फुकलं आहे. सगळेजण आपला पक्ष किती सक्षम आहे हे सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. अशातच महाविकास आघाडीदेखील या निवडणुकीसाठी प्रयत्न करत आहे.

मात्र मविआ (MVA) अडचणीत येण्याची शक्यता आहे. कारण मनसेच्या संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे. देशपांडे यांनी ठाकरे गटावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले आहेत. संदिप देशपांडे यांनी मुंबई मनपातील विरप्पन गँगचा घोटाळा सोमवारी बाहेर काढणार असल्याचा इशारा दिला आहे.

सोमवारी सगळे पुरावे सादर करणार असून पोलिसात तक्रार देखील देणार असल्याचं सांगितलं आहे. एका व्यक्तीनं पेन ड्राईव्ह मधून आपल्याला सगळे पुरावे दिलं असल्याचं म्हणलं आहे. त्यामुळं निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या आरोपांमुळं आणि 23 जानेवारीला समोर येणाऱ्या पुराव्यामुळं आता राजकारणात नेमकी काय उलथापालथ होणार. हे पाहणं गरजेच ठरणार.

महत्त्वाच्या बातम्या