Sandeep Deshpande | राज आणि उद्धव ठाकरे यांच्या नुकत्याच झालेल्या एकत्रित मेळाव्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापले आहे. ठाकरे गट आणि मनसे एकत्र आल्याने महापालिका निवडणुकीत महायुतीला मोठा धक्का बसू शकतो, अशी चर्चा सुरु असतानाच भाजप आणि शिंदे गटाकडून युतीवर टीका सुरु झाली. पण या टीकांना मनसे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी ‘एक फोटो’ शेअर करत जबरदस्त प्रत्युत्तर दिलं आहे.
राज-उद्धव युतीला ‘स्वार्थासाठी एकत्र आलेले’ असं म्हणणाऱ्या महायुतीच्या नेत्यांवर देशपांडे यांनी खरमरीत शब्दांत टीका केली. त्यांनी एक्सवर एक फोटो शेअर करत विचारलं, “राज-उद्धव सत्तेसाठी एकत्र आले म्हणणाऱ्यांनी आधी स्वतःचा इतिहास पाहावा.”
देशपांडे यांनी स्पष्ट टोला लगावला :
देशपांडे यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, भाजपमधील आलेले अशोक चव्हाण, केंद्रात मंत्री असलेले नारायण राणे, भाजपने भ्रष्टाचारी ठरवलेले छगन भुजबळ, प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे आदी नेते एकाच व्यासपीठावर बसलेले दिसत आहेत. (Sandeep Deshpande)
मग तुम्ही ? pic.twitter.com/fcVkVUgwl9
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) July 6, 2025
यावरून देशपांडे यांनी स्पष्ट टोला लगावला की, “जर राज-उद्धव युतीवर सत्ता लोलुपतेचा आरोप करायचा असेल, तर महायुतीतील हे सर्व नेते कोणत्या विचारसामर्थ्यावर एकत्र आले आहेत?”
Sandeep Deshpande | ठाकरे बंधूंच्या युतीवरून महायुती अस्वस्थ :
राज आणि उद्धव ठाकरे तब्बल २० वर्षांनी एका व्यासपीठावर आले. हे केवळ मराठी भाषेच्या मुद्द्यावरच नव्हे, तर भविष्यातील राजकीय युतीचं संकेत मानलं जात आहे. यामुळे भाजप, शिंदे गट आणि राष्ट्रवादीतील काही नेत्यांमध्ये अस्वस्थता वाढली आहे.
या युतीनंतर महायुतीकडून लगेचच राज-उद्धव बंधूंवर टीका सुरू झाली की, “हे केवळ निवडणुकीसाठीच एकत्र आलेले आहेत.” पण देशपांडे यांच्या फोटोतून दाखवण्यात आलेले वास्तव हे महायुतीलाच आरशात पाहण्यास भाग पाडत आहे. (Sandeep Deshpande)
ठाकरे युती की जनतेचा अजेंडा? :
एकीकडे मराठी अस्मिता आणि भाषेच्या मुद्द्यावर ठाकरे बंधू एकत्र आले, तर दुसरीकडे महायुतीतील अनेक नेते स्वार्थ आणि सत्तेसाठी कधीच एकत्र आले आहेत, हे वास्तव देशपांडेंनी उघड केलं आहे. त्यामुळे येणाऱ्या महापालिका निवडणुकीत ठाकरे गट-मनसे युती आणि महायुती यांच्यात खणखणीत लढत होणार, हे स्पष्ट होत आहे.