Top News राजकारण

“संजय राऊतांना आता कळलं असेल, राज ठाकरे मुख्यमंत्र्याऐवजी राज्यपालांना का भेटायला गेले”

मुंबई | वीजबिलावरून मनसेने शिवसेनेवर निशाणा साधला आहे. संजय राऊतांना आता कळलं असेल की राज ठाकरे राज्यपालांना भेटायला का गेले, असा टोला संदीप देशपांडे यांनी लगावलाय.

संदीप देशपांडे म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे काहीच निर्णय घेऊ शकत नाहीत. हे माहित असल्यानेच राज ठाकरे वाढीव वीजबिलांच्या मुद्द्यावरुन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना भेटायला गेलेले.

ठाकरे सरकारने वीज बिलांबाबत सामान्यांना दिलासा असं सुरुवातीला सांगितलं होतं, मात्र नंतर बीलं भरावी लागतील असं जाहीर केलं. यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोणताही निर्णय घेऊ शकत नाहीत, हे पुन्हा एकदा सिद्ध झालं, असं संदीप देशपांडे म्हणाले.

संदीप देशपांडे पुढे म्हणाले, “कोरोनाच्या काळात अनेकांची कार्यालयं बंद होती. त्यामुळ वीज न वापरताही नागरिकांनी बील का भरावं? जनता रस्त्यावर उतरत नाही तोपर्यंत सरकारचं डोकं ठिकाणावर येणार नाही. त्यामुळे आता सरकारने यासाठी तयार राहावं.”

महत्वाच्या बातम्या-

भाजप नेते राम कदम यांना मुंबई पोलिसांनी घेतलं ताब्यात

काँग्रेस अध्यक्षपदासाठी डिसेंबरमध्ये होणार निवडणूक प्रक्रिया

पुढच्या लिलावात चेन्नईने महेंद्रसिंग धोनीला सोडून द्यावं; माजी खेळाडूचं मत

“महाराष्ट्र पोलिसांची माफी मागा अन्यथा तुमचे सर्व धंदे बाहेर काढू”

शरद पवार यांचा उत्तर महाराष्ट्र दौरा रद्द नाही तर…- एकनाथ खडसे

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या