पवार साहेबांची गुप्त भेट घेताना 2000 साल का आठवलं नाही?

मुंबई | पवार साहेबांची गुप्त भेट घेताना 2000 साल का आठवलं नाही?, असा सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी केलाय. ट्विटरवर त्यांनी यासंदर्भात ट्विट केलंय. 

मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी घेतलेल्या शरद पवार यांच्या मुलाखतीवरुन उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांना लक्ष्य केलं होतं. 

बाळासाहेबांना अटक झाली तेव्हा शिवसेना प्रमुखांबद्दची आपुलकी कुठे गेली होती?, असा सवाल उद्धव ठाकरेंनी शरद पवार यांना विचारला होता, मात्र आता मनसेने याच मुद्द्यावरुन उद्धव ठाकरे यांचे चिमटे काढल्याचं दिसतंय.