महाराष्ट्र मुंबई

“वर्षभर आम्ही तुमचं ऐकलं, एक दिवस आमचं ऐका”

मुंबई | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे नागरिकांना नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी 31 डिसेंबरला निर्बंध शिथिल करण्याची मागणी केली आहे.

वर्षभर आम्ही तुमचं ऐकलं, एक दिवस आमचं ऐका ! नागरिकांना 31 डिसेंबरला नववर्षाचे स्वागत करू द्या !, अशी विंनंती संदीप देशपांडेंनी मुख्यमंत्र्यांना केली आहे.

राज्य सरकारनं ब्रिटनमध्ये नव्या रुपातील कोरोना आढळल्यामुळे राज्यातील महापालिका क्षेत्रात रात्री 11 ते पहाटे 6 पर्यंत संचारबंदी लागू केली आहे. या काळात 4 पेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे.

नववर्षाच्या निमित्तानं विविध ठिकाणी स्वागताच्या पार्ट्या होत असतात. त्यामुळं 31 डिसेंबरला एक दिवस लोकांवरील निर्बंध शिथिल करण्याची मागणी मनसेच्या वतीनं सरचिटणीस संदीप देशपांडेंनी केली आहे.

थोडक्यात बातम्या-

“बिहारमध्ये नितीश कुमार यांचं सरकार लवकरच कोसळणार”

भाजप नेते आशिष शेलारांनी केलं मुख्यमंत्र्यांच्या मुलाचं कौतूक

दीड महिन्यांच्या बाळाच्या श्वसननलिकेत अडकली सेफ्टी पिन; पिन काढण्यात डॉक्टरांना यश

…म्हणून आव्हाड म्हणत आहेत की ठाकरे सरकारविरूद्धही आंदोलन करा

रात्री लवकर न झोपल्याचे परिणाम; अंपायरने भर मैदानात केलं असं काही की….; पाहा व्हिडीओ

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या