मुंबई | अस्मिता महत्त्वाची की लाचारी ते ठरवा, असा टोला मनसे नेते संदीप देशपांडे यांनी शिवसेना नेते नितीन नांदगावकर यांना लगावला आहे. हिरानंदानी-नांदगावकर वादाच्या पार्श्वभूमीवर देशपांडे यांनी हा टोला लगावला आहे.
नितीन नांदगावकर यांना फोन करून एका व्यक्तीने जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर देशपांडे यांनी अस्मिता महत्त्वाची की लाचारी ते ठरवा अशा शब्दात नांदगावकर यांना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.
कोरोनाग्रस्त रिक्षाचालकाचा मृतदेह ताब्यात द्यावा तसंच हिरानंदानी रूग्णालय प्रशासनाने कुटुंबाला दिलेले बिल कमी करावं यासाठी नांदगावकर यांनी रूग्णालय प्रशासनाशी हुज्जत घालत त्यांना जाब विचारला होता. यावेळी तिथल्या सुरक्षारक्षकांशी आणि त्यांची बाचाबाची झाली. या साऱ्या प्रकारानंतर एका व्यक्तीने नांदगावकर यांना फोन करून थेट जीवे मारण्याची धमकी दिली आहे.
दुसरीकडे नितीन नांदगावकर हे विधानसभा निवडणुकीआधी मनसेला रामराम ठोकून शिवसेनेत दाखल झाले होते. परप्रांतीय तसंच मुजोर रिक्षाचालकांविरोधात त्यांची खास आंदोलने प्रसिद्ध आहे. त्यांच्या आंदोलनांचा ‘नांदगावकर पॅटर्न’ मुंबई तसंच महाराष्ट्राला परिचित आहे.
दरम्यान, नितीन नांदगावकर यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याने संबंधित व्यक्तीविरोधात त्यांनी नेहरुनगर पोलीस ठाण्यात दिली आहे. पोलिस आता अधिक तपास करत आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
राजगृह तोडफोड प्रकरणी मुंबई पोलिसांनी केली दुसरी मोठी कारवाई
कोरोना महामारीच्या काळात पहिल्यांदाच कोकिलाबेन रूग्णालयात ‘ही’ मोठी शस्त्रक्रिया
खासगी लॅबचा अहवाल पाॅझिटिव्ह तर सरकारी अहवाल निगेटिव्ह; पुण्यातील धक्कादायक प्रकार
धारावीचा धोका टळला अन् सुरू झालाय मुंबईतल्या या भागात कोरोनाचा हैदोस!