महाराष्ट्र मुंबई

वसुलीसेना?; मुख्यमंत्र्यांचा फोटो छापून फेरीवाल्यांकडून फाडल्या जातायेत पावत्या

मुंबई | मनसे नेते संदीप देशपांडे यांनी पत्रकार परिषद घेत शिवसेनेकडून फेरीवाल्यांना देण्यात आलेल्या पावत्या दाखवल्या. मी आज पुरावे घेवून आलोय की विरप्पन गँग कशी खंडणी वसूल करते, असं संदिप देशपांडे यावेळी म्हणाले.

शिवसेना फेरीवाल्यांकडून रीतसर पावती देवून खंडणी वसूल करते. या पावतीवर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे फोटो आहेत, असं देशपांडे यांनी सांगितलं.

आमची मागणी आहे की खंडणीखोरांना चाप बसला पाहिजे. खंडणीखोरांवर कारवाई व्हायलाय पाहिजे. महानगरपालिकेची लोकं कुणी या खंडणी प्रकरणांमध्ये सामिल आहेत का? याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी संदिप देशपांडे यांनी केली.

मला सगळ्यात जास्त दु:ख याचं वाटतंय की या पावतीवर बाळासाहेबांचा फोटो आहे, असं संदिप देशपांडे म्हणाले.

 

 

थोडक्यात बातम्या-

उपमुख्यमंत्री बदलण्याचा प्रस्ताव?; अजित पवार म्हणतात…

“हे जय शहा… BCCI सोबत करारबद्ध असलेल्या क्रिकेटपटूंच्या अकाउंंटवरुन ट्विट करु नका”

जनतेला सर्वात मोठा धक्का; LPG सिलेंडरच्या किंमती पुन्हा वाढल्या; पाहा नवे दर

“देशाच्या एकतेला प्राधान्य राहिल अशी सर्वांनी शपथ घ्यायला हवी”

शिवेंद्रराजेंनी शशिकांत शिंदेंना दिलेल्या धमकीवर अजित पवार म्हणाले…

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या