बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“बंद पडलेल्या मॉलमध्ये कोविड सेंटर सुरु करण्यात कुणाचा फायदा होता?”

मुंबई | भांडुप येथील ड्रीम मॉलमध्ये रात्री 12 वाजताच्या दरम्यान भीषण आग लागली आहे. या मॉलमध्ये सनराईज हे कोव्हिड रुग्णालय आहे. काल रात्री लागलेल्या या आगीत कोविड रुग्णालयातील अनेक जणांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे.

भांडुप येथील ड्रीम मॉलमध्ये लागलेल्या आगीमुळे सनराईज रुग्णालयातील रुग्णांच्या झालेल्या मृत्यूंची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गंभीर दखल घेतली असून प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन त्यांनी पाहणीही केली. या घटनेची चौकशी करण्यात येणार असून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाखांची आर्थिक मदत करणार असल्याचंही उद्धव ठाकरेंनी जाहीर केलं. मात्र यावरून मनसेनं सरकारवर निशाणा साधला आहे.

बंद पडलेल्या मॉलमध्ये कोविडसेंटर सुरू करण्यात कुणाचा फायदा होता?, असा सवाल मनसे नेते संदिप देशपांडे यांनी केला आहे. तसेच कोरोनाच्या काळात पैसे उकळण्यासाठी या रुग्णालयाला परवानगी दिली होती का, असा सवाल त्यांनी विचारला. स्थानिक अधिकाऱ्यांना निलंबित केले पाहिजे. प्रशासन फक्त नावाला चौकशी करते, पुढे काहीच येत नाही, अशी टीका संदीप देशपांडे यांनी केली.

भाजप नेते किरीट यांनीही या घटनेवरून सरकारवर आणि पालिकेवर निशाणा साधला आहे. रुग्णांचा मृत्यू कोरोनामुळे झाला असा दावा करणाऱ्यांना आधी तुरुंगात टाका. रुग्णांच्या मृत्यूसाठी मॉलच्या मालकांना जबाबदार धरले पाहिजे, अशी मागणी सोमय्या यांनी केली आहे.

थोडक्यात बातम्या- 

दिपाली चव्हाण आत्महत्येप्रकरणी उप वनसंरक्षक विनोद शिवकुमारला अटक!

लोकांची थोडी मानसिकता केली पाहिजे ना?; अजित पवारांचं महत्त्वाचं वक्तव्य

मॉलमधील आगीत होरपळून ठार झालेल्या मृतांच्या कुटुंबीयांची मुख्यमंत्र्यांनी मागितली माफी, म्हणाले…

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची तब्येत बिघडली, रुग्णालयात दाखल

वनअधिकारी दिपाली चव्हाणांची मन सुन्न करणारी सुसाईट नोट आली समोर!

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More